• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how amla can harm your hair side effects and precautions hair care tips svk

Side Effects of Amla: आवळा केसांसाठी वरदान की संकट? चुकीच्या वापरामुळे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

केस काळेभोर, मजबूत आणि दाट दिसावेत म्हणून आवळा वापरला जातो. मात्र, चुकीचा किंवा जास्त वापर केल्यास हाच आवळा केसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

September 26, 2025 17:56 IST
Follow Us
  • how amla can harm your hair
    1/9

    आवळ्याच्या अतिरेक वापरामुळे केस गळण्याची समस्या वाढते! आवळा केसांसाठी गुणकारी मानला जातो, मात्र जास्त वापरल्यास तो केस ड्राय आणि भंगुर करू शकतो, त्यामुळे केस गळतीची समस्या गंभीर होऊ शकते. (Photo Source: Unsplash)

  • 2/9

    स्कॅल्पवर खाज आणि लालसरपणा निर्माण होऊ शकतो. काही लोकांना आवळ्यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शन होते, यामुळे टाळूवर खाज, जळजळ आणि लालसरपणा जाणवू शकतो. केमिकल ट्रीटमेंट घेतलेल्या केसांवर याचा धोका अधिक असतो. (Photo Source: Unsplash)

  • 3/9

    आवळ्यामुळे केसांचा नेहमीचा रंग बदलू शकतो आवळा नैसर्गिक काळसरपणा देतो. दीर्घकाळ वापरल्यास केस गडद काळे किंवा डार्क ब्राऊन होतात. हलक्या रंगाच्या केसांवर हे परिणाम अधिक स्पष्ट दिसतात. (Photo Source: Unsplash)

  • 4/9

    योग्य प्रकारे न धुतल्यास केस कठोर आणि निस्तेज होतात आवळा पावडर किंवा रस केसांमध्ये व्यवस्थित न धुतल्यास केस राठ, निस्तेज आणि निर्जीव होतात, त्यामुळे आवळा नेहमी कॅरियर ऑईल, दही किंवा अ‍ॅलोवेरा सोबत वापरणे फायदेशीर ठरते. (Photo Source: Unsplash)

  • 5/9

    संवेदनशील टाळूसाठी आवळा त्रासदायक ठरू शकतो ड्राय किंवा सेंसिटिव्ह टाळू असणाऱ्या लोकांनी आवळ्याचा अतिरेक वापर टाळावा. यामुळे टाळू अधिक संवेदनशील होऊन कोरडेपणा व जळजळ वाढू शकते. (Photo Source: Pexels)

  • 6/9

    संतुलित प्रमाणातच वापरा आवळा आवळा नेहमी मर्यादित प्रमाणातच वापरावा. आवळ्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस आणि टाळूसाठी तो हानिकारक ठरू शकतो. (Photo Source: Pexels)

  • 7/9

    स्कॅल्पवर लावण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा थेट टाळूवर आवळा लावण्यापूर्वी लहानसा पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे, त्यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शन टाळता येते. (Photo Source: Unsplash)

  • 8/9

    आवळा नेहमी तेल, दही किंवा मॉइश्चराइजिंग घटकांसोबत मिसळा थेट वापरण्याऐवजी आवळा नारळ तेल, दही किंवा अ‍ॅलोवेरा जेलसोबत मिसळून वापरल्यास तो सुरक्षित आणि अधिक प्रभावी ठरतो.  (Photo Source: Unsplash)

  • 9/9

    त्रास जाणवल्यास त्वरित वापर थांबवा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या आवळा वापरल्यानंतर जर अॅलर्जी, खाज किंवा कोणताही त्रास जाणवला तर ताबडतोब त्याचा वापर बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Photo Source: Unsplash)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेअर केअर टिप्सHair Care Tips

Web Title: How amla can harm your hair side effects and precautions hair care tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.