-
आजच्या धकाधकीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. कर्करोग (कॅन्सर) हा केवळ एक आजार नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्याला हादरवून टाकणारी भीती आहे.
-
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत वेळोवेळी बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. कॅन्सर म्हटलं की लगेच औषधं, शस्त्रक्रिया, तपासण्या आणि जीवनशैलीतले बदल आठवतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का की, तुमच्या दैनंदिन आहारातील काही साधी पेयेदेखील शरीरात कॅन्सरविरोधी ढाल उभी करू शकतात?
-
हार्वर्ड-ट्रेन्ड गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी नुकतंच सांगितलंय की, केवळ तीन पेयं तुमचं शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
-
या साध्या, परंतु आरोग्यदायी पेयांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्यास कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो… पण ही पेयं कोणती? आणि त्यात कॅन्सरचा धोका कमी करण्यासारखं नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया..
-
ग्रीन टी: ग्रीन टीला नेहमीच ‘सुपर ड्रिंक’ म्हटलं जातं. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या घटकांपासून पेशींचे संरक्षण करतात.
-
विशेषतः स्तन, प्रोस्टेट व कोलन कॅन्सरच्या धोक्याला हा चहा कमी करतो, असं अभ्यास सांगतो.
-
ग्रीन स्मूदी: पालक, काकडी, सेलरी व आलं यांचं मिश्रण म्हणजे ग्रीन स्मूदी. डिटॉक्स हा शब्द फॅशनेबल असला तरी खरा डिटॉक्स म्हणजे पेशींना पोषण देणं. पालक व सेलरीतील फोलेट आणि फायबर पोटाच्या कॅन्सरविरोधात उपयुक्त ठरतात.
-
काकडीमुळे शरीराला हायड्रेशन मिळतं; तर आलं सूज कमी करणारं जिंजरॉल देतं. खरं म्हणजे या स्मूदीमुळे निरोगी पेशी दीर्घकाळ वाढणे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होणे असा दुहेरी फायदा होतो.
-
हळदीचं दूध मिरे घालून मिळवा खास ट्विस्ट: हळदीतील करक्युमिन कॅन्सर पेशींवर नियंत्रण ठेवतो, असं संशोधन सांगतं. त्यात काळी मिरी घातल्यानं या घटकाचं शोषण वाढतं. प्रयोगशाळेतील अभ्यासात करक्युमिनने गाठी कमी झाल्याचं दिसून आलंय.
-
माणसांवरील परिणाम अजून अभ्यासाधीन असला तरी नियमितपणे हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरातील सूज कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दीर्घकालीन रोगांचा धोका कमी होतो.
-
महत्त्वाची सूचना: ही माहिती फक्त शैक्षणिक आहे; वैद्यकीय सल्ला नाही. मोठे बदल करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
-
तंबाखूचा त्याग, नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणावर नियंत्रण, ध्यान-योगाचा सराव व पुरेशी झोप – हे सगळं एकत्र साध्य झाल्यामुळेच खरं संरक्षण कवच तयार होतं. फक्त पेय नव्हे, तर एकूण जीवनशैलीतील बदलच तुमचं आरोग्य सुरक्षित राखू शकतो. (फोटो सोजन्य : AI Generated\Freepik)
कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ ३ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
Cancer Prevention Drinks: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आजपासून प्या ‘ही’ घरगुती पेये आणि कॅन्सरपासून स्वतःचे रक्षण करा
Web Title: Reduce cancer risk naturally harvard doctor reveals 3 drinks that could lower your cancer risk pdb