-
Foods That Increase Risk Of Lung Cancer: फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात होणार्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. (सर्व फोटो सौजन्य : Unsplash आणि Pexels)
-
फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे फुफ्फुसातील पेशींची अनियंत्रित वाढ होणे.
-
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण धूम्रपान आहे.
-
प्रक्रिया केलेले मांस जसे की हॉट डॉग्स, सॉसेज, हॅम यांसारख्या पदार्थ (उदा. नायट्रोसो कंपाऊंड्स) सतत खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.
-
जास्त तापमानावर तळलेले किंवा भाजलेले स्टार्चयुक्त (पिष्टमय) पदार्थ (उदा. फ्रेंच फ्राईज, चिप्स). यांमध्ये ऍक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
-
साखरेचे प्रमाण जास्त असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शरीरात जळजळ वाढवतात, ज्यामुळे कर्करोगासह इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
-
जास्त प्रमाणात दारू पिणे हे देखील फुफ्फुसांच्या संसर्गास अधिक संवेदनशील बनवून धोका वाढवू शकते.
-
धूम्रपान पूर्णपणे टाळणे आणि सकस आहार (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य) घेणे, तसेच नियमित व्यायाम करणे हे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…
Lung Cancer Risk: ‘या’ पदार्थांच्या सेवनाने वाढतो फुप्फुसांचा कर्करोगाचा धोका?
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण धूम्रपान आहे.
Web Title: Eating these foods regularly can increase risk of lung cancer read details health care sdn