-
टूथपेस्टचा वापर : जुनी टूथपेस्ट आणि जुना टूथब्रश वापरून स्विच बोर्डवर हलक्या हाताने घासा. नंतर कोरड्या कापडाने तो स्वच्छ करा. काही मिनिटांत स्विच बोर्ड अगदी नव्यासारखा दिसेल.
-
लिंबू व मिठाची क्लीनिंग हॅक : अर्ध्या लिंबावर मीठ लावा आणि स्विच बोर्डवर हलके घासा. लिंबातील आम्लामुळे आणि मिठाच्या घासण्यामुळे घाण लगेच दूर होते. फक्त त्यावेळी स्विच बंद असणे आवश्यक आहे.
-
जिद्दी डागांसाठी उपाय: नखांसाठी वापरले जाणारे पॉलिश रिमूव्हर वापरून, जुने डाग आणि काळसर ठसे सहज काढता येतात. थोडे रिमूव्हर कापडावर लावा आणि ते हळुवार घासा.
-
सुरक्षेचा विचार : स्विच बोर्ड साफ करताना नेहमी वीजप्रवाह खंडित करा. पायांत शूज घाला आणि बोर्ड कोरडा होईपर्यंत स्पर्श टाळा.
-
जोखीम टाळा : स्विच, प्लग किंवा वायरला ओल्या हातांनी किंवा पायांनी स्पर्श करू नका. ओल्या पृष्ठभागावर उभे राहणे किंवा ओल्या कपड्यांनी विजेशी निगडित वस्तू साफ करणे धोकादायक ठरते.
-
घरगुती चमक मिळवा : हे सोपे उपाय वापरून स्विच बोर्ड रासायनिक क्लीन्सरशिवाय नवीन वस्तूप्रमाणे चमकदार बनवा.
-
दिवाळीची तयारी : दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण घर स्वच्छ करताना स्विच बोर्डही नव्याप्रमाणे चमकल्याने घराच्या आकर्षकतेत अधिक भर पडेल.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनस्प्लॅश)
Diwali Cleaning Tips : स्विच बोर्ड चमकवण्याचे ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय
दिवाळीच्या तयारीला सुरुवात झालीय? मग घर स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी सोपे घरगुती उपाय…
Web Title: Diwali cleaning tips easy home remedies to make switchboards shiny safe and attractive svk 05