-
पचन सुधारते: भाजलेला पेरू आहारातील तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतो, जो पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव करतो. पेरू भाजल्याने तो अधिक मऊ होतो आणि विशेषतः संवेदनशील पोट असणाऱ्यांसाठी पचायला तो सोपा जातो.
-
हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक : पेरूमध्ये पोटॅशियम आणि विद्राव्य तंतुमयता असते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. भाजलेला पेरू हा चविष्ट आणि हृदयासाठी हितकारक नाश्ता ठरतो.
-
रोगप्रतिकार शक्ती वाढवतो: पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. भाजल्यावरही या पोषक तत्त्वांमध्ये फारसा फरक पडत नाही; उलट त्यामुळे पेरूची तुरट चव कमी होते.
-
श्वसनासाठी उपयुक्त: गरम भाजलेला पेरू पारंपरिक उपायांमध्ये खोकला, सर्दी व घसा खवखवणे असा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. तो घशाला आराम देतो आणि हंगामी बदलांमुळे होणाऱ्या त्रासात नैसर्गिक दिलासा देतो.
-
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: पेरूमधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात, ज्यामुळे त्वचा उजळते आणि केस मजबूत होतात. भाजल्यावरही हे सौंदर्यवर्धक पोषक घटक टिकून राहतात.
-
वजन नियंत्रणात मदत: भाजलेला पेरू कमी कॅलरी आणि जास्त तंतुमयतेनं युक्त असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे अनावश्यक खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
-
चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम: पेरू हे स्वतःच पोषक फळ असले तरी भाजल्यावर त्याची चव अधिक खुलते आणि काही आरोग्यदायी फायदेही वाढतात. म्हणून पुढच्या वेळी पेरू खाण्याआधी तो हलकासा भाजून बघा आरोग्य आणि चवीचा अप्रतिम मेळ अनुभवायला मिळेल. (सर्व फोटो सौजन्य : अन्सप्लॅश)
भाजलेला पेरू खाण्याचे ‘हे’ भन्नाट फायदे; चव वाढते आणि आरोग्यही सुधारते!
पचन सुधारण्यापासून ते त्वचेच्या उजळपणापर्यंत; भाजलेल्या पेरूमुळे मिळतात ही पोषण तत्वे
Web Title: Roasted guava delicious healthy snack for glowing skin strong immunity and overall wellness health tips svk 05