• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ayurvedic home remedies for mouth ulcers ghee guava castor oil gulkand natural healing svk

तुम्हालाही सारखं तोंड येतं? ‘हे’ पाच पदार्थ ठरू शकतात अल्सरवर रामबाण उपाय

तोंडातील अल्सरवर घरगुती उपाय: आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांचे मार्गदर्शन

October 16, 2025 16:37 IST
Follow Us
  • Mouth ulcers painful,
    1/7

    तोंडातील अल्सर त्रासदायक पण उपचार सोपे! तोंडातील अल्सर म्हणजेच जखमा केवळ वेदनादायक नसतात, तर खाणं-पिणंही कठीण करतात. विशेषत: तिखट पदार्थ खाताना त्रास वाढतो. हे अल्सर ताण, अयोग्य आहार, अन्नातील अॅलर्जी किंवा आतड्यांच्या संसर्गामुळे होऊ शकतात. (फोटो सौजन्य : Wikimedia Commons)

  • 2/7

    औषधांऐवजी घरगुती उपाय आजमवा आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा यांच्या मते, तोंडातील अल्सरवर बी-कॉम्प्लेक्स गोळ्या किंवा जेल वापरण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय करूनही आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य : indian express)

  • 3/7

    तूप – अल्सरवर त्वरित शांती देणारा उपाय दररोज अल्सरच्या जागी थोडंसं तूप लावा, काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर थुंका. यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि हळूहळू अल्सर कमी होऊ लागतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/7

    पेरूची पाने – नैसर्गिक वेदनाशामक पेरूची कोवळी पानं किंवा कळ्या चघळल्याने अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते. तसेच हे उपाय अल्सर लवकर बरे होण्यासही मदत करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/7

    एरंडेल तेल – शरीरातील उष्णता कमी करणारे एरंडेल तेल (कॅस्टर ऑईल) शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. वारंवार अल्सर होत असतील तर अल्सरच्या ठिकाणी हे तेल हलकेच लावा, त्यामुळे उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते आणि अल्सर लवकर भरतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/7

    गुलकंद – गोड उपाय, पण प्रभावी दररोज जेवणाच्या आधी १ ते २ चमचे गुलकंद घेतल्यास अल्सरमुळे होणारी जळजळ कमी होते आणि जखमा लवकर भरतात. गुलकंद शरीराला थंडावा देऊन तोंडातील अल्सरवर परिणामकारक ठरते. (फोटो सौजन्य : Wikimedia Commons)

  • 7/7

    आयुर्वेदाचा सल्ला – नैसर्गिक उपचारांकडे वळा डॉ. डिंपल जांगडा यांच्या म्हणण्यानुसार, आयुर्वेदातील हे साधे उपाय शरीरातील संतुलन राखतात, त्यामुळे औषधांपेक्षा नैसर्गिक उपचारांनी अल्सरवर नियंत्रण ठेवणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Ayurvedic home remedies for mouth ulcers ghee guava castor oil gulkand natural healing svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.