-

Diwali Faral: दिवाळी म्हणजे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची एक पर्वणी. चिवडा, अनारसे, चकली, शेव, लाडु, करंजी, शंकरपाळे या पारंपरिक फराळाच्या यादीत आला पाकातील चिरोटे, बुंदीचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिक्स याशिवाय शेवचे असंख्य प्रकार समाविष्ट झाले आहेत.
-
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर लगेच १ चमचा बडीशेप आणि थोडीशी खडीसाखर एकत्र चावून खा.
-
बडीशेप व खडीसाखर खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि पोटात थंडावा मिळतो.
-
रोज साखर न घालता अर्धा कप थंड दूध प्या.
-
दुधातील कॅल्शियम अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते आणि जळजळ कमी होते.
-
१ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा उकळवा. पाणी गाळून ते कोमट असताना हळूहळू प्या. ओवा पचन सुधारतो आणि गॅस कमी करण्यास मदत करतो.
-
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर आल्याचा एक छोटा तुकडा सैंधव मीठाबरोबर खा.
-
आलं पचनास मदत करते आणि मळमळ कमी करते.
-
दिवाळीच्या दिवसात भरपूर पाणी प्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
Diwali 2025: दिवाळीचा फराळ खाल्ल्यामुळे अॅसिडिटी होतेय? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
दिवाळीच्या दिवसात भरपूर पाणी प्या.
Web Title: Eating diwali faral causes acidity then follow these easy home remedies to get rid of stomach pain vomiting sdn