-
दिवाळीत फराळासाठी भरपूर पदार्थ बनवले जातात. पण, त्यात शंकरपाळी सुद्धा अनेकांची आवडती असते. पण, तुम्ही दरवर्षी एकाच पद्धतीची शंकरपाळी बनवून आणि खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: @Chatgpt)
-
आज आपण गव्हाच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या याबद्दल जाणून घेणार आहोत… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
गव्हाच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी अर्धी वाटी दूध, साखर, दोन वाट्या गव्हाचे पीठ, चीरणी इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर अर्धी वाटी दूध गरम करा आणि त्यात साखर घाला. साखर विरघळली की, गॅस बंद करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दोन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घ्या आणि दोन चमचे तेल गरम करून घ्या आणि मिक्स करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर त्यात तयार दूध टाका आणि पीठ मळून घ्या. मग पिठाचे गोळे करा आणि एक गोल पोळी लाटून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर तयार पोळी चीरणीच्या सहाय्याने शंकरपाळीच्या आकारात कापून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर तेलात तळून घ्या. अशाप्रकारे गव्हाच्या शंकरपाळ्या तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)
रवा, मैदा न वापरता बनवा ‘खुसखुशीत शंकरपाळ्या’; पाहा झटपट होणारी सोपी रेसिपी
Shankarpali Unique Recipe : तुम्ही दरवर्षी एकाच पद्धतीची शंकरपाळी बनवून आणि खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
Web Title: How to make gavhachya shankarpali or wheat shankarpali recipe in marathi asp