-
Diwali: दिवाळीतील भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
-
भाऊबीजच्या शुभ दिवशी, भावाला पूर्वेकडे तोंड करून पाट किंवा आसनावर बसवावे.
-
टिळा लावण्याआधी, बहिणीने भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात.
-
टिळा लावताना बहिणीने भावासाठी दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि आनंदाची प्रार्थना करावी.
-
सुपारी आणि सोन्याच्या दागिण्याने ओवाळावे. साखर किंवा मिठाई देऊन त्याचे तोंड गोड करावे. तुप किंवा तेलाच्या दिव्याने आरती ओवाळावी.
-
भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
-
(भाऊबीजेशी संबंधित पौराणिक कथा) मान्यतेनुसार, या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेकवेळा बोलावल्या नंतर तिच्या भेटीला गेला होता.
-
यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि टिळक करून त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. प्रसन्न होऊन यमराजांनी बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले.
-
यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळक करेल ती तुला घाबरणार नाही.
-
यमराजाने यमुनेला वरदान दिले. या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे म्हणतात.
-
Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.
Bhau Beej 2025: भाऊबीज करताना भावाला ‘याच’ दिशेला बसावावे? काय सांगते पौराणिक कथा..
टिळा लावताना बहिणीने भावासाठी दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि आनंदाची प्रार्थना करावी.
Web Title: Diwali bhau beej 2025 follow these important tips while doing aarti puja traditional rituals mythological story sdn