-
ॲपल सायडर व्हिनेगर (ACV) हे अनेक फायद्यांसाठी उपयुक्त आहे. केसांसाठी घरच्या घरी ॲपल सायडर व्हिनेगरचा मास्क बनवणे खूप उपयोगी ठरते. हे टाळूचा नैसर्गिक pH संतुलित ठेवते, कोंडा कमी करते आणि केसांवरील घाण किंवा बिल्डअप साफ करते. (स्त्रोत-फ्रीपिक)
-
एका भांड्यात ॲपल सायडर व्हिनेगर, मध आणि तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तेल एकत्र मिसळा. ओल्या केसांवर लावा, नीट विंचरून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा. नंतर धुवा. (स्रोत- फ्रीपिक)
-
१ टेबलस्पून ॲपल सायडर व्हिनेगर, १ अंडं आणि १ टीस्पून मध मिक्स करा. हे केसांमध्ये मसाज केल्यानंतर थोडा वेळ तसे ठेवा. (स्रोत- फ्रीपिक)
-
दोन टेबलस्पून एरंडेल तेल आणि दोन टेबलस्पून ॲपल सायडर व्हिनेगर घ्या आणि मिसळा. टाळूमध्ये मसाज केल्यावर शॅम्पू आणि पाण्याने धुवा. (स्रोत- फ्रीपिक)
-
ऑलिव्ह तेल, मध आणि ॲपल सायडर व्हिनेगर नीट मिसळून पातळ करा. टाळू आणि केसांवर दहा ते पंधरा मिनिटे लावल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. (फ्रीपिक)
-
डॉ. मिकी सिंग, संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर, बॉडीक्राफ्ट क्लिनिक्स, ॲपल सायडर व्हिनेगर वापराविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. त्या म्हणतात, “ॲपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांचे वैज्ञानिक पुरावे अजूनही खूपच अनुभवावर आधारित असे आहेत, आणि त्याची मात्रा व वापर वेगवेगळा असल्यामुळे परिणाम सतत नसू शकतात आणि टाळूला जळजळ किंवा केसांच्या क्यूटिकलला नुकसान होण्याचा धोका असतो.” त्यामुळे अशा उपायांचा वापर सावधपणे करावा, आधी पॅच टेस्ट करावी, आणि संवेदनशील त्वचा किंवा टाळूच्या समस्या असलेल्या लोकांसाठी विशेष शॅम्पू, कंडीशनर किंवा इतर वैद्यकीयदृष्ट्या तपासलेले उपचार अधिक सुरक्षित आणि निश्चित परिणाम देऊ शकतात, हे लक्षात घ्यावे.(स्रोत- फ्रीपिक)
Dandruff Hair Mask: केसातील कोंडा होईल गायब! वापरा DIY अॅपल सायडर व्हिनेगर हेअर मास्क, जमा झालेली सगळी घाण निघून जाईल…
Hair Mask: अॅपल सायडर व्हिनेगर हेअर मास्क आपल्या टाळूचे नैसर्गिक पीएच राखण्यास मदत करतात, केसातील कोंडा दूर करते आणि जमा झालेली घाण साफ करते.
Web Title: Dandruff hair mask diy apple cider vinegar for dandruff best anti dandruff hair mask dvr