-

निरोगी आतडे हे तुमच्या एकूण आरोग्याचा पाया आहे. पण, आपल्यापैकी बरेच जण त्यांच्या सकाळची सुरुवात अशा प्रकारे सुरू करतात ज्यामुळे पचन, आतड्यांचे आरोग्य आणि बरेच काही प्रभावित होते. सकाळी कॉफी पिण्यापासून ते अगदी नाश्ता वगळण्यापर्यंतच्या अनेक सवयी तुमच्या आतड्यावर आणि आरोग्यावर नकळत परिणाम करत असतात. त्यामुळे सकाळच्या दिनचर्येतील छोटे आणि साधे बदल तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. पोटफुगी कमी करून दीर्घकालीन आतड्यांचे आरोग्य राखू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तुमचे आतडे निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत तुम्ही कोणते बदल करावेत याबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. हायड्रेशन – सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. खोलीच्या तापमानात पाणी पिल्याने विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुरू होते. तासनतास झोपेनंतर ते तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट करते आणि आतड्यांच्या हालचालींना चालना देते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. आतड्यांसाठी अनुकूल पेय – कॉफीवर अवलंबून राहण्याऐवजी, तुमचा दिवस लिंबू पाणी, आलं टाकून केलेला चहा किंवा सफरचंद सायडर व्हिनेगरने सुरू करण्याचा प्रयत्न करा. यामुळे पाचन एंजाइम्सना उत्तेजित होऊ शकतात आणि तुमच्या आतड्यांमध्ये अधिक संतुलित वातावरण तयार करू शकतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. फायबरयुक्त पदार्थ खा – सकाळी आहारात फायबरचा समावेश केल्याने तुमच्या पोटातील चांगल्या जिवाणूंना (गुड बॅक्टेरिया) अन्न मिळते. बेरी, अळशीचे बी आणि पालेभाज्या यांसारखे पदार्थ प्रीबायोटिक्स देतात; जे आतड्यातील चांगल्या जीवाणूंना वाढायला मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. हळूवार हालचाल – स्ट्रेचिंग, योगा किंवा अगदी थोडे चालणे रक्तप्रवाह उत्तेजित करण्यास आणि पचनसंस्थेतील हालचाल सुधारण्यास मदत करते. सकाळच्या शारीरिक हालचालींमुळे तणाव संप्रेरकांचे (स्ट्रेस हार्मोन्स) प्रमाण देखील कमी होते; जे आतड्यांच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. नाश्ता वगळू नका – आरोग्यदायी आणि पौष्टिकतेने समृद्ध नाश्ता केल्याने तुमची पचनसंस्था कामाला लागते. ओट्स, चिया पुडिंग किंवा अंडी, फायबरयुक्त फळे,भाज्या खाल्याने आतड्यातील निरोगी बॅक्टेरियांना फायदा होतो.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा – पेस्ट्री किंवा तृणधान्ये यांसारख्या नाश्त्या केल्यामुळे आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरियांना अन्न मिळते. यामुळे पोटातील चांगल्या आणि वाईट जिवाणूंचा समतोल बिघडतो. पण, जर आपण सकाळी संपूर्ण आणि पौष्टिक अन्न निवडलं, तर दिवसाची सुरुवात चांगली होते, आपल्याला ऊर्जा मिळते, पचन सुधारतं आणि शरीरही हलकं-ताजं वाटतं. (फोटो सौजन्य: @Freepik)
पोटातील सर्व घाण सकाळीच स्वच्छ होईल; आतड्यांमधील विषारी पदार्थ झटक्यात पडतील बाहेर, सकाळी फक्त ‘हे’ पाणी प्या
Morning Habits for Healthy & Regular Digestion : सकाळच्या दिनचर्येतील छोटे आणि साधे बदल तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. पोटफुगी कमी करून दीर्घकालीन आतड्यांचे आरोग्य राखू शकतात.
Web Title: Morning routine for gut health or what to eat in the morning for good digestion asp