-

अंडी खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचं कवच (कवट) फेकून देत असाल तर थांबा. कारण या कवचाचे देखील बरेच फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अंड्याच्या कवचाचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. (Photo Source : Unsplash)
-
स्क्रबिंग एजंट
मोठे तवे किंवा चिकट झालेली मोठी भांडी घासताना साबणाच्या पाण्यात अंड्याच्या कवचाचा चुरा करून मिसळा आणि ते पाणी भांडी घासताना वापरा, यामुळे भांडी स्वच्छ होतील. (Photo Source : Unsplash) -
नैसर्गिक कीटक प्रतिबंधक
पाल, गोगलगायी किंवा इतर कीटकांना घरापासून, स्वयंपाकघरापासून दूर ठेवायचं असेल तर अंड्याच्या कवचाचा वापर करता येतो. तसेच छोट्या रोपांना कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी अंड्याच्या कवचाचा चुरा करून रोपाच्या भोवती पसरवा. (Photo Source : Unsplash) -
वनस्पतींसाठी खत
कुस्करलेल्या अंड्यांच्या कवचांमुळे माती कॅल्शियमने समृद्ध होते, ज्यामुळे टोमॅटो, मिरची आणि गुलाब यांसारख्या वनस्पती व रोपं मजबूत होण्यास मदत होते.(Photo Source : Unsplash) -
कॅल्शियम सप्लिमेंट
गरम पाण्यात उकळून बारीक पावडर केल्यानंतर अंड्याचं कवच नैसर्गिक कॅल्शियम वाढवण्यासाठी उपयोगी मानलं जातं. ते पदार्थ व स्मूदीमध्ये मिसळता येतं. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Photo Source : Unsplash) -
पक्ष्यांच्या खाद्यात भर : अंड्यांची कवचे स्वच्छ धुवा, त्यांचा चुरा करा आणि पक्ष्यांच्या खाद्यात घाला, पक्ष्यांची कॅल्शियमची गरज यामुळे पूर्ण होईल. (Photo Source : Unsplash)
-
अंड्याच्या कवचाची पावडर घरच्या घरी बनवलेल्या नेल किंवा फेस मास्कमध्ये मिसळता येते, ज्यामुळे नखं मजबूत होतात आणि त्वचेच्या आरोग्यास मदत होते. (Photo Source : Unsplash)
अंड्याचं कवच फेकून देताय? कीचनपासून गार्डनिंगपर्यंतचे हे सहा फायदे जाणून घ्या!
आम्ही तुम्हाला अंड्याच्या कवचाचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत. ते वाचून तुम्ही अंड्याचं कवच फेकून देणार नाही.
Web Title: Uses of eggshells from kitched in gardening iehd import asc