-

केस गळतीची समस्या आता घरच्या घरी दूर करा आजकाल अनेकांना केस गळती, कोरडेपणा आणि कमजोर केस यांची तक्रार असते. घरच्या काही नैसर्गिक उपायांनी ही समस्या सहज कमी करता येते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नैसर्गिक औषधी तेल तयार करण्याची पद्धत एक कप नारळाचे तेल, तीन चमचे एलोवेरा जेल आणि कढीपत्ता एकत्र करून उकळवा. तेल उकळू लागल्यावर दहा मिनिटे हलवून शिजवा आणि नंतर थंड करून बाटलीत साठवा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
केसांवर तेल लावण्याची योग्य वेळ हा उपाय आठवड्यात दोनदा केल्यास केस मजबूत होतात. तेल लावून दहा मिनिटे हलके मसाज करा आणि एका तासानंतर केस धुवा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नियमित वापराने फायदा एक महिन्यापर्यंत सतत या तेलाचा वापर केल्यास केस गळती कमी होते आणि केसांच्या वाढीला गती मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
एलोवेराचे फायदे एलोवेरा केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतो, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते आणि ते आरोग्यपूर्ण राहतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नारळाच्या तेलाचे फायदे नारळाचे तेल केसांची मुळे मजबूत करतात आणि केसांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कढीपत्त्याचे फायदे कढीपत्ता केसांचा रंग गडद ठेवतो आणि केस गळती थांबवण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
केस गळती थांबवण्याचा ‘रामबाण’ उपाय! घरच्या घरी बनवा ‘हे’ खास नैसर्गिक तेल
फक्त तीन वस्तूंचा वापर करून केस होतील मजबूत, घनदाट आणि चमकदार; वापरण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
Web Title: Natural hair oil for hair fall strength thickness shine coconut aloe curry leaves svk 05