-

वाढत्या वयाच्या मुलांसाठी दूध आणि केळीचे मिश्रण अत्यंत उपयुक्त आहे. हे मिश्रण मुलांना आवश्यक पोषण आणि ऊर्जा देते, ज्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते.
-
चांगली झोप आणि आराम : दूध आणि केळीमध्ये ट्रिप्टोफॅन, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारखे आरोग्यदायी घटक असतात. हे घटक मज्जातंतू आणि स्नायूंना शांत करून आराम देतात, ज्यामुळे मुलांना चांगली व शांत झोप लागण्यास मदत होते.
-
हाडे आणि दातांचे आरोग्य : दुधातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’, तसेच केळ्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. हे संमिश्रण लहान मुलांच्या वाढीच्या काळात मजबूत हाडे आणि दात यांसाठी उपयुक्त ठरते.
-
स्नायूंची वाढ आणि ऊर्जा : दुधातील उच्च प्रथिने स्नायूंच्या विकासाला हातभार लावतात. तर, केळ्यातील नैसर्गिक साखर आणि दुधातील कर्बोदके त्वरित आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात, ज्यामुळे मुले दिवसभर सक्रिय राहू शकतात.
-
उत्तम पचनक्रिया : केळी आहारातील फायबरचा चांगला स्रोत असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. त्यामुळे दुधासोबत केळ्याचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते.
-
जीवनशैलीसाठी समर्थन : शारीरिक वाढ आणि सक्रिय जीवनशैलीसाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण पोषण असलेल्या दूध आणि केळ्याचे एकत्र पिण्याने मिळते.
-
पोषण समाविष्ट करण्याचा सोपा उपाय : तुमच्या मुलांच्या दैनंदिन आहारात पोषण समाविष्ट करण्यासाठी दूध आणि केळ्याचे हे जुने, पण फायदेशीर मिश्रण एक सोपा आणि स्वादिष्ट असा पर्याय आहे.
-
मेंदूचा विकास आणि एकाग्रता: दूध आणि केळ्यामध्ये ‘बी’ जीवनसत्त्वे (B vitamins) आणि आवश्यक फॅट्स असतात. विशेषतः, केळ्यातील व्हिटॅमिन ‘बी६’ न्यूरोट्रान्समीटर तयार करून, मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
लहान मुलांसाठी दूध आणि केळी आहे ‘अमृत’! जाणून घ्या ‘हे’ सात फायदे
केळी आणि दूध एकत्र का प्यावे? वाचा, मजबूत हाडे, ऊर्जा व तल्लख मेंदूसाठी हे मिश्रण का आहे ‘सुपरफूड’
Web Title: Top health benefits of milk and banana for kids daily growth and nutrition health tips svk 05