• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the worst habits for your brain or which habits damage the brain asp

तुम्हालाही ‘या’ वाईट सवयी आहेत का? मग तुमच्याही मेंदूला नकळत पोहचते हानी

Everyday habits secretly damaging your brain : मेंदूचे कामकाज, गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता, काम योग्य पद्धतीने वाटून घेण्याची ताकद यावर तुमच्या चुकीच्या दैनंदिन सवयींचा वाईट परिणाम होऊ शकतो…

October 26, 2025 18:52 IST
Follow Us
  • bad-habits-affect-brain
    1/9

    आजच्या धावपळीच्या जगात स्वतःसाठी वेळ काढणेही कठीण होऊन जाते. अशातच आपण स्वतःकडे जास्त लक्ष न देता फक्त काम करत असतो. पण, अयोग्य आहार, पुरेशी झोप न घेणं किंवा चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी फक्त शरीर नाही तर मेंदूलाही नुकसान पोहचवतात. त्यामुळे गोष्टी लक्षात न राहण्यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    आपला मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे आणि त्याची काळजी घेणे आपलं पाहिलं प्राधान्य असलं पाहिजे. आतड्यांचे आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर पाल माणिकम यांनी अलीकडेच सोशल मीडियावर मेंदूच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कारण – मेंदूचे कामकाज, गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता, काम योग्य पद्धतीने वाटून घेण्याची ताकद यावर तुमच्या चुकीच्या दैनंदिन सवयींचा वाईट परिणाम होऊ शकतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर अशा १० दैनंदिन सवयी आहेत; ज्या नकळत तुमच्या मेंदूच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकतात…
    १. झोप टाळणे – जर तुम्हाला गाढ झोप नाही येत असेल तर शरीरात साचलेले घातक पदार्थ (टॉक्सिन्स) नीट बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता, निर्णय घेणे आणि लक्ष केंद्रित करणे यांवर परिणाम करतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    २. जास्त वेळ बसून राहणे – जास्त वेळ बसून राहिल्याने मेंदूला होणारा रक्त प्रवाह कमी होतो आणि हिप्पोकॅम्पल संकोचनाशी त्याचा संबंध आहे.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    ३. मल्टीटास्किंग करणे – एका वेळी अनेक गोष्टी केल्याने कार्यक्षमता, लक्ष देण्याची क्षमता आणि काम करण्याची स्मरणशक्ती कमी होते.

  • 6/9

    ४. अयोग्य आहार – प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले आहार जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवतात; ज्यामुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    ५. ताण – जास्त ताण घेतल्याने कॉर्टिसोल हिप्पोकॅम्पसला नुकसान पोहोचवते, स्मरणशक्ती कमकुवत करते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणते.
    ६. एकटेपणा – जर माणूस इतरांशी बोलणं, भेटणं टाळत असेल तर त्याला नैराश्य येण्याची शक्यता वाढते आणि हळूहळू त्याच्या विचार करण्याची व लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    ७. हेडफोनद्वारे गाणी ऐकणे – श्रवणशक्ती कमी होते, ज्यामुळे मेंदूचा ताण आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो.
    ८. मेंदूला आव्हान न देणं – जर कोडं सोडवणे, वाचन करणे आणि नवनवीन गोष्टी शिकत राहणे या गोष्टी तुम्ही करत नसाल तर मेंदूचे मार्ग कमजोर होतात आणि विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    ९. पुरेसे पाणी न पिणे – डिहायड्रेशनमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.(फोटो सौजन्य: @Freepik)
    १०. झोपण्यापूर्वी जास्त वेळ मोबाईल बघणे – मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनला दाबतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास अडथळा येतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: The worst habits for your brain or which habits damage the brain asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.