• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to limit screen time parenting tips for screen addiction 7 tips in marathi rak

Ways to Cut Kids’ Screen Time : मुलांच्या हातातून मोबाइल सुटत नाहीये? स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी हे ७ गोष्टी ठरतील ‘गेम चेंजर’

मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे सोपे नाही, पण ते अशक्य देखील नाही. थोडी शिस्त आणि प्रेमाने तुम्ही त्यांना या सवयीपासून मुक्त करू शकता. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे हे एका दिवसाचे काम नाही, तर त्यासाठी काही दिवस मेहनत घ्यावी लागेल.

October 26, 2025 23:12 IST
Follow Us
  • आजच्या डिजिटल युगात मोबाइल, टीव्ही अशा डिव्हाईसनी मुलांच्या दिनचर्येचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. अभ्यासापासून ते करमणूकीपर्यंत प्रत्येक गोष्ट आता स्क्रीनवरच होत आहे. परंतु, हीच सवय जेव्हा अति होते तेव्हा त्याचा मुलांच्या डोळ्यांवर, झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo Source: Pexels)
    1/1

    आजच्या डिजिटल युगात मोबाइल, टीव्ही अशा डिव्हाईसनी मुलांच्या दिनचर्येचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. अभ्यासापासून ते करमणूकीपर्यंत प्रत्येक गोष्ट आता स्क्रीनवरच होत आहे. परंतु, हीच सवय जेव्हा अति होते तेव्हा त्याचा मुलांच्या डोळ्यांवर, झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo Source: Pexels)

  • 2/1

    त्यामुळे पालकांसाठी मुलांचा स्कीन टाइम कमी करण्यासाठी काहीतरी उपाय करणे गरजेचे बनून गेले आहे. आज आपण असेच काही उपाय जाणून घेणार आहोत. (Photo Source: Pexels)

  • 3/1

    लहान मुले बऱ्याचदा त्यांच्या पालकांचे पाहून शिकत असतात. जर तुम्ही दिवसभर मोबाईल किंवा टीव्ही पाहात असाल तर मुलांकडून वेगळी अपेक्षा करणे कठीण होऊन जाते त्यामुळे असे करू नका. प्रयत्न करा की घरात टेक-फ्री वातावरण तयार होईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर असाल तेव्हा फोन किंवा टीव्हीचा वापर करू नका. (Photo Source: Pexels)

  • 4/1

    दिवसभरासाठी मोबाईल किंवा टीव्हीसाठी एक वेळ निश्चित करा, जसे की शाळेतून आल्यानंतर ३० मिनिटं किंवा जेवणाच्या नंतर १ तास. हे नियम काटेकोरपणे लागू करा, तसेच मुलांना हे त्यांच्या फायद्यासाठी असल्याचेही समजावून द्या आणि हा नियम न पाळल्यास सौम्य शिक्षा देखील करता येऊ शकते, जेणेकरून शिस्त लागेल. (Photo Source: Pexels)

  • 5/1

    मैदानात जाऊन खेळणे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप आवश्यक असते, त्यामुळे त्यांना पार्क किंवा मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. सायकल चालवणे, बॅडमिंटन खेळणे, धावणे हे त्यांचे आरोग्य सुधारेल. याबरोबरच त्यांची स्क्रीनची सवय मोडण्यासही फायदेशीर ठरेल. (Photo Source: Pexels)

  • 6/1

    मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना चित्रकला, डान्स, संगीत अशा वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवून ठेवा, यामुळे वेळेचा चांगला उपयोग होईल, याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देखील मिळेल. (Photo Source: Pexels)

  • 7/1

    कुटुंबासोबत वेळ घालवणे मुलांसाठी खूप आवश्यक गोष्ट आहे. संध्याकाळी त्यांच्याबरोबर गोष्टी ऐका, बोर्ड गेम्स खेळा किंवा बाहेर फिरायला जा. यामुळे मुलांना वाटेल की त्यांच्या पालकांना त्यांच्याबरोबर वेळ घालवणे आवडते, त्यामुळे ते स्वतःच मोबाईलपासून दूर राहतील. (Photo Source: Pexels)

  • 8/1

    झोपण्याच्या खोली मोबईल किंवा टीव्ही ठेवण्याची सवय सोडून द्या. यामुळे मुलेच नाही तर प्रौढांच्या झोपेची गुणवत्ता देखील प्रभावित होते. जर मोबाईल किंवा टॅबलेट जवळ नसेल तर मुले रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहणार नाहीत. (Photo Source: Pexels)

  • 9/1

    घरात काही जागा या टेक-फ्री झोन घोषित करा. जसे की डायनिंग टेबल, फॅमिली टाइम किंवा पूजेचा वेळ. या ठिकाणी कोणतीही स्क्रीन वापरणे बंद करा. यामुळे कुटुंबात संवाद वाढतो. (Photo Source: Pexels)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: How to limit screen time parenting tips for screen addiction 7 tips in marathi rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.