-

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. त्यामध्ये आवश्यक खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्सचा समावेश असतो. याचा हृदयाच्या आरोग्यापासून ते झोपेपर्यंत सर्व गोष्टींना फायदा होता.
-
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम आणि गुड फॅट रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
-
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, जस्त, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने असतात, जे एकूण आरोग्यासाठी आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक असतात.
-
यात असलेल्या झिंक आणि व्हिटॅमिन ई मुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते तुमच्या शरीराचे संक्रमणांपासून संरक्षण करतात.
-
संशोधनातून असे दिसून आले आहे की, भोपळ्याच्या बियांचे तेल प्रोस्टेट वाढ रोखू शकते आणि मूत्राशयाचे कार्य सुधारू शकते.
-
भोपळ्याच्या बिया ट्रिप्टोफॅनचे नैसर्गिक स्रोत असतात, जे तुमच्या शरीराला चांगल्या झोपेसाठी सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते.
-
भोपळ्याच्या बियांतील फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते, चयापचय प्रक्रियेसाठी मदत करते.
भोपळ्याच्या बिया खाण्याचे ‘हे’ ६ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
भोपळ्याच्या बियांचे हे काही आरोग्यदायी फायदे आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत.
Web Title: 6 benefits of having pumpkin seeds aam