-

तुमच्या काही चुकीच्या दैनंदिन सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत असं तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, तज्ज्ञांनी अशा काही सवयींची नोंद केली आहे ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यापैकी एक जरी सवय तुम्हाला असेल तर तुम्ही ती ताबडतोब बंद करा. (Photo Source: Unsplash)
-
मिठाचं अधिक सेवन करणे
अधिक मिठाचं सेवन केल्यास रक्तदाब वाढतो, ज्यामुळे कालांतराने तुमच्या धमन्या आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. (Photo Source: Unsplash) -
एकाच जागी बराच वेळ बसून राहणे
एकाज जागी जास्त वेळ बसून राहिल्याने रक्ताभिसरण कमी होते, कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयरोगाचा धोका वाढतो, तुम्ही नंतर व्यायाम केला तरी झालेलं नुकसान भरून काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही एकाच जागी बसून काम करत असाल तर अधून मधून ब्रेक घेत राहा. उभे राहा किंवा काही शारीरिक हालचाली करा. (Photo Source: Unsplash) -
नाश्ता वगळणे
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचा आहे. परंतु, तुम्ही नाश्ता वगळला तर चयापचय बिघडू शकतं, कोलेस्टेरॉल वाढू शकतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. (Photo Source: Unsplash) -
झोपेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे
दररोज किमान ६-७ तास झोपलंच पाहिजे. ६ तासांपेक्षा कमी झोपल्यास रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य बिघडतं. (Photo Source: Unsplash) -
धूम्रपान करणे
धुम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.(Photo Source: Unsplash) -
अनियंत्रित ताण
दीर्घकालीन ताणामुळे कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक (हॉर्मोन) स्रवते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि धमन्यांमध्ये जळजळ (दाह) होऊ शकते. (Photo Source: Unsplash)
लोकांच्या ‘या’ सवयी हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतायत अत्यंत धोकादायक
हृदयाच्या आरोग्यासाठी या सहा अत्यंत धोकादायक सवयी आहेत.
Web Title: Extremely dangerous everyday habits for heart health iehd import asc