-  

स्नायू बांधण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. मात्र, ‘जास्त घेतलं की जास्त चांगलं’ हा समज चुकीचा ठरू शकतो. शरीरात प्रोटीनचे प्रमाण जास्त झाल्यास ते अनेक अवयवांवर आणि प्रणालींवर नकारात्मक परिणाम करू शकते. जाणून घ्या, प्रोटीनचे अति सेवन केल्याने होणारे सहा लपलेले धोके. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
हृदयावर वाढते ताण जास्त प्रोटीन, विशेषतः लाल मांस आणि प्रोसेस्ड मीटमधून घेतलेले, शरीरात कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढवते. दीर्घकाळात यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
शरीरात पाण्याची कमतरता प्रोटीनच्या पचनासाठी शरीराला अधिक पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी न घेतल्यास डिहायड्रेशन, थकवा आणि अंगदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
पचनतंत्रावर परिणाम फायबरचे प्रमाण कमी आणि प्रोटीनचे सेवन जास्त असल्यास पचन बिघडते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि आंत्रातील जंतूंचे असंतुलन निर्माण होऊ शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
मूत्रपिंडांवर ताण प्रोटीनचे अति सेवन केल्यास युरिया आणि नायट्रोजनचे प्रमाण वाढते. हे फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंडांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. आधीपासूनच किडनीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे विशेष धोकादायक ठरू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
पोषक घटकांची कमतरता प्रोटीनवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचे सेवन कमी होते, त्यामुळे व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरता जाणवू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 -  
वजन वाढण्याचा धोका प्रोटीन वजन कमी करण्यात मदत करते, परंतु दीर्घकाळ जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरीज साठू लागतात. परिणामी वजन पुन्हा वाढू शकते. (टीप: येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
 
जास्त प्रोटीन घेताय? सावधान! तुमच्या शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
स्नायूंसाठी आवश्यक असलेले प्रोटीन जर अति प्रमाणात घेतले तर ते हृदय, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेलाही त्रासदायक ठरू शकते. संतुलित आहारच आहे खऱ्या आरोग्याचं रहस्य.
Web Title: Excess protein intake hidden health risks impact on heart kidneys digestion svk 05