• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sadhguru amazing health benefits of coconut water and pomegranate juice natural elixir for body svk

सद्गुरुंनी सांगितले नारळ पाणी आणि डाळिंबाचा रस एकत्र करून पिण्याचे ‘हे’ अद्भुत फायदे

सद्गुरुंनी सांगितले आहे की नारळाचे पाणी आणि डाळिंबाचा रस दोन्ही फळांचे मिलाफ हे शरीरासाठी संपूर्ण आरोग्याचे अमृतासमान पेय ठरते.

November 4, 2025 17:20 IST
Follow Us
  • Sadhguru on coconut and pomegranate juice benefits
    1/9

    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सद्गुरुंनी नारळ आणि डाळिंबाच्या बियांचा ज्यूस हा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असल्याचे सांगितले आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास हे पेय शरीराला ऊर्जा, पोषण आणि शुद्धता प्रदान करते. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    दिवसाची सुरुवात नैसर्गिक आरोग्य पेयाने सद्गुरुंनी सांगितले की, दिवसाची सुरुवात आरोग्यदायी ज्यूसने केली तर शरीरातील कार्यक्षमता वाढते. नारळ आणि डाळिंब यांचा संयोग शरीराला नैसर्गिक हायड्रेशन आणि ऊर्जा देतो. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    नारळाच्या पाण्याचे विलक्षण गुणधर्म कोवळ्या नारळाचे पाणी हे निसर्गाने दिलेले सर्वोत्तम इलेक्ट्रोलाइट ड्रिंक आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असून ते शरीरातील द्रव संतुलन राखते आणि उष्णता कमी करते. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    आयुर्वेदातील नारळाचे महत्त्व आयुर्वेदानुसार नारळाचे पाणी पचन सुधारते, मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते आणि मूत्राशयातील खडे बरे करण्यात मदत करते. तसेच ते त्वचेवरील रॅश आणि उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांवरही प्रभावी ठरते. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/9

    वैज्ञानिक अभ्यासातील निष्कर्ष ‘Coconut water of different maturity stages ameliorates inflammatory processes’ या अभ्यासानुसार, कोवळ्या नारळाच्या पाण्यात तीव्र दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म आहेत. यात असलेले लॅरिक अ‍ॅसिड शरीरातील जंतूंशी लढण्यास मदत करते. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/9

    व्यायामानंतरचे सर्वोत्तम पेय तज्ज्ञांच्या मते, व्यायामानंतर नारळाचे पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुनर्भरण करते, थकवा कमी करते आणि ताजेतवानापण देते; त्यामुळे हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून प्रसिद्ध आहे. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    डाळिंबाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे सद्गुरुंच्या ब्लॉगनुसार, १०० मिली डाळिंबाच्या रसात प्रौढ व्यक्तीच्या दररोजच्या व्हिटॅमिन C गरजेपैकी १६% भाग मिळतो. तसेच यात व्हिटॅमिन B5, फायबर आणि पोटॅशियमही आहे, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायी आहेत. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    संशोधनानुसार डाळिंबाचे औषधी गुण ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’च्या अहवालानुसार, डाळिंबातील पॉलीफिनॉल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक हे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि दाह कमी करण्यात मदत करतात. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म ग्रीन टी आणि रेड वाइनपेक्षा जास्त असल्याचे नमूद आहे. (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फाेटाे सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Sadhguru amazing health benefits of coconut water and pomegranate juice natural elixir for body svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.