• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. pomegranate benefits and side effects health tips for safe consumption health tips svk

‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये डाळिंब; काहींसाठी अमृत नाही, तर अपायकारक आहे हे फळ

डाळिंब जरी पोषक आणि स्वादिष्ट असले तरी प्रत्येकासाठी ते योग्य नसते. काही आरोग्य स्थितींमध्ये याचे सेवन टाळणेच हितावह ठरते.

Updated: November 5, 2025 16:10 IST
Follow Us
  • pomegranate benefits and side effects
    1/8

    डाळिंब हे पोषणाने समृद्ध आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यात लोह, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. मात्र, हे फळ प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच, असे नाही. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 2/8

    अॅलर्जी असलेल्यांनी घ्यावी काळजी
    त्वचेवरील अॅलर्जी, खाज किंवा रॅशेस असलेल्या व्यक्तींनी डाळिंब टाळावे. त्यातील काही घटक त्वचेवर लालसरपणा आणि खाज वाढवू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 3/8

    कमी रक्तदाब असलेल्यांनी दूर राहावे
    डाळिंबाचा थंड गुणधर्म असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. कमी रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे फळ घातक ठरू शकते. त्यामुळे सेवन मर्यादित ठेवा किंवा टाळा. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 4/8

    पचनाच्या त्रासात डाळिंब टाळा
    ज्यांना गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी डाळिंब खाणे टाळावे. त्यामुळे पचन मंदावते आणि पोटदुखी किंवा फुगणे वाढू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 5/8

    सर्दी-खोकल्यात डाळिंब नको
    थंडी, खोकला किंवा घशात खवखव असल्यास डाळिंब खाल्ल्याने त्रास वाढू शकतो. त्याची थंड प्रकृती कफ वाढवते आणि शरीराला अधिक जड बनवते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 6/8

    मानसिक आजार असलेल्यांनी
    मानसिक आजारांसाठी औषधे घेणाऱ्यांनी डाळिंबापासून सावध राहावे. काही संशोधनांनुसार डाळिंबातील घटकांची औषधांशी रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 7/8

    योग्य वेळ कोणती?
    सकाळच्या वेळी, विशेषतः रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात डाळिंब खाणे सर्वांत फायदेशीर असते. त्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 8/8

    काही गोष्टी लक्षात ठेवा
    डाळिंब कधीही दूध किंवा दह्यासोबत खाऊ नका. त्यामुळे पचन बिघडू शकते. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत खाल्लेले डाळिंब आरोग्यासाठी अमृतासारखे ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Pomegranate benefits and side effects health tips for safe consumption health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.