-

मलाचा रंग आरोग्याचे प्रतिबिंब आपल्या मलाचा रंग हा शरीराच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगतो. पचन, यकृत आणि पित्ताची कार्यप्रणाली या रंगावर परिणाम करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
रंगात बदल का होतो पित्त हे चरबी पचवण्यासाठी आवश्यक द्रव असून ते पिवळट-हिरवे असते. पचनमार्गातून जाताना त्याचा रंग बदलून तपकिरी होतो. या प्रक्रियेत अडथळा आल्यास मलाचा रंग बदलतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सामान्य तपकिरी रंग आरोग्यदर्शक मध्यम ते गडद तपकिरी रंग हा सामान्य मानला जातो. यकृत नीट काम करत असल्याचे आणि पचन सुरळीत असल्याचे हे चिन्ह आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मल फिकट किंवा करड्या रंगाचा झाल्यास सावध राहा फिकट किंवा मातीसारखा रंग हे पित्तपुरवठा कमी झाल्याचे द्योतक असू शकते. हे पित्तनलिकेत अडथळा, पित्ताशयातील खडे किंवा यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
गडद तपकिरी किंवा काळा रंग नेहमीच सामान्य नसतो लोहयुक्त अन्न किंवा औषधांमुळे रंग गडद होऊ शकतो, पण काळसर मल हा पचनतंत्रात रक्तस्त्रावाचे संकेत देतो, अशावेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
हिरवा, पिवळा किंवा नारिंगी रंग काय दर्शवतो हिरवा मल म्हणजे अन्न आतड्यातून फार लवकर जात आहे. पिवळा किंवा तेलकट मल म्हणजे चरबी शोषणात अडचण. नारिंगी रंग गाजर, रताळ्यासारख्या बीटा-कॅरोटीनयुक्त अन्नामुळे येतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
संतुलित आहाराने रंग पुन्हा सामान्य होतो पुरेसा फायबरयुक्त आहार, पाणी आणि प्रोबायोटिक्स घेण्याने पचन सुधारते. प्रक्रिया केलेले अन्न कमी खाल्ल्यास आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास रंग सामान्य होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सतत बदल जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या मलाचा रंग काही दिवसांपेक्षा जास्त बदललेला राहिला, तसेच थकवा, डोळ्यांचा पिवळेपणा किंवा वेदना असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
मलाचा रंग सांगतो शरीरातील रहस्य! तुमचे यकृत आणि पचनसंस्था निरोगी आहे का ते जाणून घ्या…
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पचनतंत्र, यकृत आणि पित्ताचे आरोग्य जाणून घ्या फक्त मलाच्या रंगातून लहानसा बदलही देऊ शकतो मोठा संकेत
Web Title: What the colour of your poop reveals about your liver and gut health early warnings for body health svk 05