• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. throat remedies best natural options for relief asp

घसा खूपच खवखवतोय, खोकलाही जाता जाईना; मग ‘हा’ खास चहा ठरेल रामबाण उपाय

Throat Remedies : चहा तुमच्या शरीराला आतून उबदार ठेवतो आणि नैसर्गिकरित्या तुमच्या घशाचे रक्षण करतो. हा चहा फक्त आरामदायी नसून त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, संसर्गाशी लढण्यासाठी आणि श्वसनाच्या आरोग्याला आधार देण्यासाठी फायदेशीर ठरतो.

November 7, 2025 22:45 IST
Follow Us
  • Throat-infection-home-remedy
    1/8

    दिवाळीनंतर प्रदूषणाच्या पातळीतही वाढ होत चालली आहे. यादरम्यान आपल्यापैकी बऱ्याच जणांचा घसा खवखवणे, घसा बसतो, गिळताना टोचल्यासारखे वाटणे आदी समस्या जाणवू लागतात. यासाठी मास्क तुम्हाला मदत करू शकतात. पण, यासाठी स्वयंपाक घरातील काही खास पदार्थ तुमची मदत करू शकतात. तुळस, आले, मध यांचा आयुर्वेदिक चहा तुमच्या शरीराला आतून उबदार ठेवतो आणि नैसर्गिकरित्या तुमच्या घशाचे रक्षण करतो. हा चहा फक्त आरामदायी नसून त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, संसर्गाशी लढण्यासाठी आणि श्वसनाच्या आरोग्याला आधार देण्यासाठी फायदेशीर ठरतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    तुळस, आले, मधचे आरोग्यदायी फायदे –
    तुळशीला ‘औषधी वनस्पतींची राणी’ म्हटले जाते; अनेक भारतीय घरांमध्ये दिसणारी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. पोषणतज्ज्ञ रूपाली दत्ताने @food.ndtv.com ला सांगितले की, तुळशीमधला बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल गुणधर्म हंगामी संसर्गांशी लढण्यास आणि रक्तसंचय कमी करण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    आले उबदार आणि किंचित मसालेदार असूनही नैसर्गिक दाहक-विरोधी आहे; जे घशातील जळजळ शांत करते, श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करते.
    तसेच मध केवळ गोडवा वाढवत नाही घशावर लेप म्हणून काम करतो; यामुळे घशाचा कोरडेपणा किंवा वेदना कमी होण्यास मदत होते.
    एकत्रितपणे, हे तिन्ही पदार्थ एक शक्तिशाली त्रिकूट बनवतात; जे एकूणच आरोग्यास निरोगी राहण्यासाठी मदत करतात देतात; जेव्हा प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    ही आयुर्वेदिक चहा कशी बनवायची?

    साहित्य – १ कप पाणी, ४-५ ताजी तुळशीची पाने, १ छोटा आल्याचा तुकडा, १ चमचा मध लिंबाचा रस (पर्यायी)

    कृती –
    एक कप पाण्याला उकळी काढा.
    आले, तुळशीची पाने कुस्करून पाण्यात टाका.
    सुगंध येईपर्यंत ५ ते ७ मिनिटे उकळू द्या.
    गस बंद करा आणि चहा एका कपमध्ये गाळून घ्या.
    मध घालण्यापूर्वी ते थोडे थंड होऊ द्या. (उकळत्या पाण्यात मध घालू नका कारण जास्त तापमानामुळे त्याचे फायदेशीर एंजाइम नष्ट होऊ शकतात.)
    जर तुम्हाला थोडासा तिखटपणा हवा असेल तर लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला आणि हळूहळू प्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    ही चहा प्रदूषणाविरुद्ध कशी काम करते?
    १. रोगप्रतिकारक शक्ती आणि विषबाधा – तुळस रोगप्रतिकारक शक्ती आणि विषबाधा दूर करणाऱ्या शक्तिशाली, अनुकूलक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ही चहा पर्यावरणीय, शारीरिक असो किंवा भावनिक ; शरीराला तणावाशी जुळवून घेते आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकती. यामुळे श्वसनमार्गातील जळजळ कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते; ज्यामुळे तुमच्या शरीराला प्रदूषक आणि संसर्गांशी लढणे सोपे होऊन जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    २. जळजळ आणि रक्तसंचय – जेव्हा तुमचा घसा खवखवतो, तुम्हाला कफ असतो; तेव्हा आले तुमच्या मदतीला येते. त्यात जिंजरॉल सारखे संयुगे असतात; ज्यांचे दाहक-विरोधी प्रभाव असतात, जळजळ कमी करण्यास, सर्दीमुळे बंद झालेलं नाक उघडण्यास मदत होते.

  • 7/8

    ३. तुम्हाला शांत ठेवते – मध हे नैसर्गिक खोकला सिरप आहे. त्यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत; जे घशाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करू शकतात. तर त्याची गुळगुळीत पोत कोरडेपणा आणि जळजळीपासून त्वरित आराम देतो. तुळशी आणि आल्याच्या तिखट चवीला संतुलित करण्यास देखील मदत करतो; ज्यामुळे चहा पिण्याचा आनंदही वाढतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    तुळस, आले आणि मध यांपासून बनवलेला चहा दिवसातून दोनदा प्या. सकाळी एकदा तुमच्या श्वसनमार्गांना स्वच्छ करण्यासाठी, तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी, संध्याकाळी एकदा प्रदूषित हवेत दिवस घालवल्यानंतर आराम करण्यासाठी आणि रात्री घसा खवखवत असेल तर झोपण्यापूर्वी चहा कोमट करून प्या; यामुळे घशाची खवखव रात्री वाढणार नाही आणि आराम मिळेल. जास्त प्रदूषण असणाऱ्या दिवसांत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला इतर उपायांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कधीकधी, सर्वात सोपा उपाय सर्वात प्रभावी ठरू शकतात. तुळशी आल्याचा मधाचा चहा बनवणे केवळ सोपे नाही तर पौष्टिक देखील आहे.; जो तुमचा घसा स्वच्छ ठेवतो, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि आरामाची भावना प्रदान करतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Throat remedies best natural options for relief asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.