• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. pomegranate amla juice health benefits for immunity skin liver heart and brain health tips svk

डाळिंब व आवळ्याचा रस एकत्र प्यायल्याने यकृत आणि हृदयाला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला डाळिंब-आवळा रस रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, त्वचेला तजेला देतो आणि हृदय, मेंदू व लिव्हरचं आरोग्य सुधारतो.

November 9, 2025 17:05 IST
Follow Us
  • Pomegranate and amla juice for better health
    1/9

    आवळा आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी वरदान मानली जातात. डाळिंबातील लालचुटूक दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. तर, आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांच्या मते, या दोन्हींचा रस एकत्र घेतल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो डाळिंब आणि आवळा दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, थकवा कमी करतात व संसर्गांपासून बचाव करतात. आवळ्यामुळे शरीरात रोगांशी लढण्याची ताकद वाढते, तर डाळिंब शरीरातील सूज आणि विषाणूंचा मुकाबला करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    त्वचा बनते उजळ आणि तजेलदार या रसात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात. आवळा कोलेजन निर्माण वाढवतो, तर डाळिंब त्वचेतील पेशींचं नुकसान रोखतो. त्यामुळे चेहऱ्यावरचा निस्तेजपणा, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्या कमी होतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    यकृताचे (लिव्हरचे) आरोग्य सुधारते डाळिंबातील पॉलीफिनॉल्स आणि फ्लेवोनॉइड्स लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करतात. हे घटक शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यात मदत करतात. आवळा लिव्हरचे का

  • 5/9

    हृदयासाठी फायदेशीर आवळ्याला आयुर्वेदात ‘हृदयासाठी औषध’ मानलं जातं. संशोधनानुसार, आवळा कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतो; तर डाळिंब रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतं. हे दोन्ही एकत्र घेतल्यास हृदय अधिक निरोगी राहते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/9

    मेंदूची कार्यक्षमता वाढवतो डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स मेंदूमधील सूज कमी करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. दररोज डाळिंब घेतल्यास व्हिज्युअल आणि व्हर्बल मेमरी सुधारते, असे अभ्यास सांगतात. आवळादेखील मेंदूतील पेशींना संरक्षण देतो आणि एकाग्रता वाढवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    पचनसंस्था मजबूत होते हा रस शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि पचनक्रिया सुधारतो. आवळ्यामुळे आतड्यांचं कार्य सुरळीत होतं, तर डाळिंबामुळे पोटातील सूज आणि आम्लपित्त कमी होतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    रक्तातील साखर आणि फॅट नियंत्रणात ठेवतो आवळा अँटिडायबेटिक गुणधर्मासाठी ओळखला जातो. हा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. डाळिंबामुळे ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि ‘चांगलं’ कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या निरोगी राहतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    शरीराला ऊर्जा आणि ताजेतवानेपणा देतो डाळिंब आणि आवळा रसामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. दररोज सकाळी हा रस घेतल्यास थकवा, अशक्तपणा व आळस कमी होतो. हा रस दिवसभर शरीरात ताजेतवानेपणा टिकवून ठेवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Pomegranate amla juice health benefits for immunity skin liver heart and brain health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.