• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tamannaah bhatia fitness trainer suggest what is the most unhealthy breakfast asp

पौष्टीक वाटत असले तरीही नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरने दिला सल्ला

Healthy Breakfast : तुम्ही ज्याचे नाश्ता म्हणून सेवन करत आहात त्या तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहेत का?

November 9, 2025 22:08 IST
Follow Us
  • worst-breakfast-options-in-marathi
    1/8

    तुम्ही सकाळी तुम्ही जे सर्वात आधी खाता त्यावर तुमची ऊर्जा, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि दुपारच्या जेवणापर्यंत तुम्हाला भूक न लागणे या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा सगळ्यात महत्वाचा असतो. पण, तुम्ही ज्याचे नाश्ता म्हणून सेवन करत आहात त्या तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहेत का? नाही… कारण नाश्त्यादरम्यान तुम्हाला निरोगी वाटणारे काही पदार्थ खरोखरच तुमचे नुकसान सुद्धा करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    तर अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि बऱ्याच सेलिब्रिटींचे फिटनेस कोच सिद्धार्थ सिंग यांनी अलीकडेच तीन नाश्त्याच्या पर्यायांबद्दल सांगितले; जे अनेकांना पौष्टिक वाटतात . पण, त्यांना पौष्टिक बनवून आपण त्यांचे सेवन केले नाही तर त्या अजिबात आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे या पदार्थांचे अधिक पौष्टीक जेवणात कसे रूपांतर करायचे याबद्दलच्या टिप्स पुढे दिलेल्या आहेत… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    तर नेमके हे पदार्थ कोणते?
    बेसनाचे धिरडे (बेसन चिल्ला) – सेलिब्रिटींचे फिटनेस कोच सिद्धार्थ सिंग म्हणतात की, या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे असे लोक समजतात. पण, साध्या स्वरूपात बनवबनवलेले लेला बेसनाचे धिरडे किंवा बेसन चिल्ला यात फारच कमी प्रथिने असतात. त्यातच आणखीन वाईट गोष्ट म्हणजे हा पदार्थ कुरकुरीत बनवण्यासाठी तूप किंवा तेलात तळल्यामुळे त्यात फॅट वाढते. पण, प्रथिनांची कमतरता भरून निघत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    ओट्स – आरोग्याविषयी जागरूक असलेल्या अनेक लोकांसाठी ओट्स हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. फक्त खाणे ओट्स कॉम्प्लेक्स कार्ब्सचा चांगला स्रोत आहेत. पण, जर तुमचा नाश्ता फक्त ओट्स असेल (प्रथिनांशिवाय ) तर दिवसभरात तुमची ऊर्जा कमी होऊ शकते आणि नंतर तहान लागू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    फळे – फळे आरोग्यदायी असतात यात काही शंका नाही. पण, नाश्त्याला फक्त फळे खाल्याने त्यातील नैसर्गिक साखरेमुळे ऊर्जा लवकर वाढते. पण, नंतर हळूहळू ऊर्जा कमी होते. तसेच तुम्हाला लवकरच पुन्हा भूक लागत नाही. म्हणूनच फळे आहाराचा भाग असावीत. पण, नाश्ता पूर्णपणे फळांवरच अवलंबून नसावा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    मग हे तिन्ही पदार्थ खाणे सोडून द्यावे का ?

    तर नाही सेलिब्रिटींचे फिटनेस कोच सिद्धार्थ सिंग म्हणतात की, या तिन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि चांगल्या प्रथिनांची जोड देऊन तुमची ऊर्जा वाढवू शकता.
    बेसनाचे धिरडे (बेसन चिल्ला)ऐवजी, ग्रीक दही किंवा प्रोटीन पावडरचा एक चमचा खाऊ शकता; यामुळे प्रोटीन मिळतात.
    ओट्स वगळून अंडी किंवा प्रोटीन पावडर निवडणे चांगले; यामुळे कार्ब्स आणि प्रोटीन संतुलित करून ऊर्जा क्रॅश होण्यास प्रतिबंध करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    फळांऐवजी ग्रीक दही, सुकामेवा किंवा प्रोटीन पावडरचे सेवन करा ; यामुळे साखरेचे शोषण कमी होते.
    त्याचप्रमाणे फक्त ओट्स किंवा फळे खाण्याऐवजी त्यात प्रथिने मिक्स करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    बेसनाचे धिरडे (बेसन चिल्ला) जास्त प्रमाणात तूप किंवा तेलात तळणे टाळा आणि ग्रीक दह्याबरोबर सेवन करा.
    अशा छोट्या बदलांमुळे नाश्ता अधिक पौष्टिक होतो आणि शरीराला जास्त ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Tamannaah bhatia fitness trainer suggest what is the most unhealthy breakfast asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.