-

थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन होतात, ज्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि ब्लड प्रेशर वाढू शकतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
उच्च रक्तदाबाचे धोके
उच्च ब्लड प्रेशर दीर्घकाळ राहिल्यास हृदय, मेंदू आणि किडनीसंबंधी गंभीर समस्या उद्भवू शकतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
सुक्या मेव्यांचा लाभ
थंडीमध्ये सुके मेवे खाल्ल्याने ब्लड प्रेशर संतुलित राहते. यामध्ये असलेले व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
बदामाचा फायदा
बदामात असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटामिन E रक्ताभिसरण सुधारते आणि तंत्रिकांना शांत ठेवतो. रोज ४-५ बादाम खाणे योग्य ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
अक्रोड
अक्रोडातील ओमेगा-३ फॅटी असिड्स ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात आणि हृदयासाठी चांगले असतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
खजुराचा वापर
खजुरात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते. रोज २-३ खजूर सेवन करणे लाभदायक ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
काजूचे फायदे
आणि मर्यादा काजूमध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स रक्ताभिसरण सुधारतात, पण जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
मीठ आणि पाण्याचे सेवन
जास्त सोडियम ब्लड प्रेशर वाढवते. थंडीतपाणी कमी पिऊ नका. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
ठंडीमध्ये ब्लड प्रेशर वाढतोय? ‘हे’ अन्न ठेवतील रक्तदाब नियंत्रणात
सुक्या मेव्यांमध्ये असलेले व्हिटामिन, मिनरल्स, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत आणि ब्लड प्रेशर संतुलित ठेवतात.
Web Title: Winter season high blood pressure control with dry fruits healthy diet tips for bp svk 05