• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lokutsav
  4. dont buy these items on dhantrayodashi day are considered to be indicative of inauspicious events pvp

Photos : धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; मानल्या जातात अशुभ घटनांचे सूचक

शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. या गोष्टी तुमच्या आयुष्यात गरिबी आणू शकतात, असे मानले जाते. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

October 16, 2022 10:27 IST
Follow Us
  • Dhantrayodashi
    1/15

    हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. (Indian Express)

  • 2/15

    धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. बहुतेक लोक या दिवशी सोने, चांदी, पितळ यांसारखे धातू आपल्या घरी आणतात. (Reuters)

  • 3/15

    असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अनेक पटींनी अधिक शुभ परिणाम देतात. तसेच या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते. (Financial Express)

  • 4/15

    शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. या गोष्टी तुमच्या आयुष्यात गरिबी आणू शकतात, असे मानले जाते. या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. (File Photo)

  • 5/15

    ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडी वस्तू घरी आणणे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू घरात आणल्यास घरात दुर्दैवाचा प्रवेश होतो आणि त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत. (Pixabay)

  • 6/15

    धनत्रयोदशीच्या दिवशी अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करू नका. असे मानले जाते की स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमची भांडी किंवा इतर कोणत्याही वस्तूची खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि घरामध्ये गरिबी वास करते. (Freepik)

  • 7/15

    अ‍ॅल्युमिनियमवर राहूचा प्रभाव असतो असे म्हटले जाते, त्यामुळे तो अशुभ घटनांचा सूचकही मानला जातो. (Reuters) (हेही वाचा : Photos : ‘उठा उठा दिवाळी आली…’ दिवाळीच्या साफसफाईचे ‘हे’ भन्नाट मीम्स पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू)

  • 8/15

    धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये प्लास्टिकची कोणतीही वस्तू आणल्यास त्यामुळे धनाची स्थिरता आणि समृद्धी कमी होऊ शकते. (Pexels)

  • 9/15

    असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काचेच्या वस्तू खरेदी करू नयेत. अशी मान्यता आहे की आरसा किंवा काच याचा थेट संबंध राहुशी असतो. राहुने घरात प्रवेश केल्यास घरात दारिद्र्य येते. (Pexels)

  • 10/15

    ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी चिनी मातीपासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू नये. या गोष्टी घरातील समृद्धीमध्ये अडथळा आणतात, असे मानले जाते. (Pexels)

  • 11/15

    धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, मात्र या दिवशी बनावट सोन्याच्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे. (Pexels)

  • 12/15

    धनत्रयोदशी हा शुभ दिवस असल्याने लोक या दिवशी चाकू, कात्री यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करणेदेखील टाळतात. (Pexels)

  • 13/15

    धनत्रयोदशीच्या दिवशी तूप, लोणी, मोहरीचे तेल यासारख्या तेलाशी संबंधित पदार्थ खरेदी करणे अशुभ मानले जाते. (Pexels)

  • 14/15

    मात्र, सणासुदीच्या काळात तेल हे आवश्यक असलेल्या प्रमुख वस्तूंपैकी एक असल्याने, उत्सवाच्या एक दिवस आधी तुम्ही ते खरेदी करू शकता. (Pexels)

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Indian Express)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: Dont buy these items on dhantrayodashi day are considered to be indicative of inauspicious events pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.