-
चकल्या हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतात. दिवाळीच्या फराळामध्ये चकल्या आवर्जून बनवल्या जातात. (Photo : Instagram, social media)
-
अनेक जणांची तक्रार असते की खूप प्रयत्न करुनही चकल्या कुरकुरीत होत नाही. टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी खास टिप्स आणि सोपी रेसिपी सुद्धा सांगत आहोत. (Photo : Instagram, social media)
-
या टिप्सच्या मदतीने तुम्ही खुसखुशीत चकल्या बनवू शकता आणि कुरकरीत चकल्यांचा आस्वाद घेऊ शकता. (Photo : Instagram, social media)
-
साहित्य – तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मूगाची डाळ, तिखट, हळद, ओवा, पांढरे, तीळ, चकली मसाला, तेल, मीठ (Photo : Instagram, social media)
-
तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.सर्व धान्य एकत्र करुन जाडसर पीठ दळून आणा. (Photo : Instagram, social media)
-
एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे. दळून आणलेल्या पीठात हळद, ओवा, पांढरे तीळ, मीठ, चकली मसाला तिखट आणि मोहन तेल टाका. (Photo : Instagram, social media)
-
गरम पाण्याने हे पीठ मळून घ्या.हे मळलेलं पीठ चकलीच्या सांच्यात भरा आणि चकल्या पाडा.मंद आचेवर चकल्या तळून घ्या (Photo : Instagram, social media)
-
धान्य चांगले भाजले नाही तर चकल्या कुरकुरीत होत नाही. त्यामुळे धान्य चांगले भाजावे. (Photo : Instagram, social media)
-
चकलीत मोहन तेल योग्य प्रमाणात टाकावं. तेलाचं प्रमाण जास्त झाल्याने चकल्या कुरकुरीत होत नाही आणि चकल्या नेहमी मंद आचेवर तळाव्यात. (Photo : Instagram, social media)
Crispy Chakli : चकल्या कुरकुरीत होण्यासाठी जाणून घ्या या सोपी टिप्स
आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत चकल्या बनवण्यासाठी खास टिप्स आणि सोपी रेसिपी सुद्धा सांगत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही खुसखुशीत चकल्या बनवू शकता.
Web Title: Cooking hacks how to make make chakli crispy diwali food tips crispy chakli recipe ndj