-
सलग १५ वर्षांच्या काँग्रेसी राजवटीला कंटाळलेल्या आसामी जनतेने विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या पदरात भरभरून मते टाकत स्पष्ट बहुमत प्राप्त करून दिले. केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हेच आसामचे मुख्यमंत्री असतील.
-
आसामच्या रूपाने भाजपने प्रथमच ईशान्येकडील राज्यात स्वबळावर सत्ता प्राप्त केली आहे.
-
भाजपला १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत तब्बल ८६ जागांवर विजय मिळवता आला तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या २६ जागांवर समाधान मानावे लागले.
-
सीमावर्ती भागात होणारी आसामी जनतेची होरपळ, बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यात आलेले अपयश आणि भ्रष्ट राजवट या सगळ्या कारभाराला कंटाळलेल्या आसामी जनतेने गेल्या १५ वर्षांपासून सत्तेची फळे चाखणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचत भाजपला सत्तास्थानी बसवले आहे.
-
आसामच्या रूपाने भाजपने प्रथमच ईशान्येकडील राज्यात स्वबळावर सत्ता प्राप्त केली आहे.
-
भाजपला १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत तब्बल ८६ जागांवर विजय मिळवता आला तर सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या २६ जागांवर समाधान मानावे लागले.
आसामात भगवी पहाट..
Web Title: Bjp won first time in assam