-
मुंबईच्या कुलाबा परिसरातील मेट्रो हाऊस या इमारतीला गुरूवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली.
-
कुलाब्याच्या रिगल चित्रपटगृहाजवळ असणाऱ्या या चारमजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर असणाऱ्या व्हीनस हॉटेलमध्ये ही आग लागली आहे. आज दुपारी ४.३० च्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अग्निशामन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
-
हा परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने अग्निशामन दलाला आग विझविण्यात अडथळे येत आहेत. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
या आगीचे स्वरूप भीषण असून परिसरात मोठ्याप्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यांवर कॅफे मोंडेगार आणि मॅकडोनाल्डची दालने आहेत. या दालनांमध्ये असणाऱ्या गॅस सिलिंडर्समुळे आगीचा धोका आणखी वाढला आहे.
-
पोलिसांकडून इमारतीचा परिसर खाली करण्यात आला असून या भागातील वाहतूकही अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे.
-
या परिसरात लिओपोल्ड कॅफे आणि ताज हॉटेलसारखी अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे असल्यामुळे याठिकाणी परदेशी पर्यटकांचीही वर्दळ असते.
-
मुंबईच्या कुलाबा परिसरातील मेट्रो हाऊसला लागलेल्या भीषण आगीची दृश्ये.
कुलाब्यातील मेट्रो हाऊसला भीषण आग
Web Title: Fire breaks out at colaba causeway in mumbai