-
नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रबोधिनीला १०० वर्षांचा इतिहास आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका महिला प्रशिक्षणार्थीने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची मानाची तलवार प्राप्त केली. मीना तुपे असे या महिलेचे नाव आहे. या सन्मानानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे असे अभिनंदन केले. मीना तुपे यांचे आई-वडील शेतकरी आहेत. पोलीस दलात भरती होण्यापूर्वी त्यांनीही आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत केली होती. (छायाचित्र – मयूर बारगजे)
-
प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (छायाचित्र – मयूर बारगजे)
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीक्षांत संचलनावेळी स्नातकांनी सलामी दिली. (छायाचित्र – मयूर बारगजे)
-
खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होण्यासाठी सज्ज झालेल्या एका महिला प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन करताना तिचे कुटुंबीय. (छायाचित्र – मयूर बारगजे)
-
राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित होते. (छायाचित्र – मयूर बारगजे)
Maharashtra Police Academy: महिला पोलीस प्रशिक्षणार्थीची ऐतिहासिक कामगिरी
नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
Web Title: Historic moment at passing out parade of maharashtra police academy