• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. how to link aadhaar pan deadline is 31 december scsg

‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक करण्यासाठी शेवटची मुदत, अन्यथा रोखला जाऊ शकतो पगार

जाणून घ्या ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक न केल्यास होणारे फायदे आणि नुकसान

December 30, 2019 08:59 IST
Follow Us
  • ‘पॅन कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी लिंक करण्यासाठी केवळ एकच दिवस उरला आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप पॅन आधारशी लिंक केले नसले तर तुमच्या जवळ अद्यापही संधी आहे. कारण जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. कारण यापुढे सरकार यासाठी मुदत वाढ देण्याची शक्यता कमी आहे. सरकारने यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ही अंतिम मुदत दिली आहे. जाणून घेऊयात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास काय फटका बसू शकतो आणि नक्की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कसे करावे याबद्दल...
    1/15

    ‘पॅन कार्ड’ला ‘आधार कार्ड’शी लिंक करण्यासाठी केवळ एकच दिवस उरला आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप पॅन आधारशी लिंक केले नसले तर तुमच्या जवळ अद्यापही संधी आहे. कारण जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. कारण यापुढे सरकार यासाठी मुदत वाढ देण्याची शक्यता कमी आहे. सरकारने यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ही अंतिम मुदत दिली आहे. जाणून घेऊयात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास काय फटका बसू शकतो आणि नक्की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कसे करावे याबद्दल…

  • 2/15

    ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक न केल्यास होणारे नुकसान – जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.

  • 3/15

    पॅन कार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा पॅन कार्ड बनवण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसणार.

  • 4/15

    तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.

  • 5/15

    पगार रोखला जाण्याची शक्यता – जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण कंपन्या करमर्यादेच्यावर असणाऱ्या पगारावर टीडीएस कापून घेतात. मात्र, तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. ज्यामुळे तुमच्या पगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणेच हिताचे ठरणार आहे.

  • 6/15

    ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक केल्याने होणारे फायदे – तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक आहे तर तुम्हाला नवे बँक खाते सहजासहजी उघडता येणे शक्य आहे.

  • 7/15

    ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक असेल तर तुम्हाला आयटीआर भरण्यासही यामुळे अडचण येणार नाही.

  • 8/15

    तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डिमॅट अकाऊंट सुरु करता येणे सोपे होईल. कारण, यासाठी पॅन आणि आधार क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे.

  • 9/15

    ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक असेल तर नवे डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड मिळवणेही अधिक सोयीस्कर होणार आहे.

  • 10/15

    ‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक कसे करावे हे जाणून घेऊयात

  • 11/15

    १. तुम्ही आयकर विभागाच्या साईटवर डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे. https://incometaxindiaefiling.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करता येईल.

  • 12/15

    २. ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.

  • 13/15

    ३. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.

  • 14/15

    ४. ही माहिती भरुन झाल्यानंतर खाली कोड दिलेला असेल ज्याला Captcha Code असं म्हणतात. तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.

  • 15/15

    ५. ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊ जाईल.

Web Title: How to link aadhaar pan deadline is 31 december scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.