-
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पुणे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी ‘यंग इंडिया अगेन्स्ट सीएए-एनआरसी-एनपीआर कमिटी’तर्फे राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात तरुण, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. ‘इन्कलाब झिंदाबाद’सारख्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. हल्ल्याचा निषेध करतानाच जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (सर्व फोटो: अरुल होरायझन)
-
या मोर्चात तरुण, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
-
या मोर्चात तरुण, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
-
मोर्चेकरी विद्यार्थ्यांच्या हातात वेगवेगळे फलक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फ्रेम्सही होत्या.
-
अनेक विद्यार्थ्यींनी पोस्टर्समधून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधाला.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधाला.
-
केंद्र सरकारच्या विरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
पुण्यात मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
-
अनेकांनी वेगवेगळे पोस्टर्स या मोर्चामध्ये आणले होते.
-
यावेळेस विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘इन्कलाब झिंदाबाद’सारख्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
-
या मोर्चेकऱ्यांनी तिरंगा घेऊन आंदोलन केलं.
-
अशा टीशर्टच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आले
‘आधी Gujarat Model आता India मोडेल’; पुणेकर विद्यार्थ्यांची पोस्टरबाजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाणा
Web Title: Pune students protest against jnu attack scsg