-
करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला जनता संचारबंदीचे आवाहन केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेवरील तब्बल १२० आणि पश्चिम रेल्वेवरील ३७३ मेल-एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडय़ा पहाटे ४ ते रात्री १० या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उपनगरी रेल्वे सेवा (लोकल) अंशत: सुरू राहणार आहे. याचा परिणाम आज जनता कर्फ्यूच्या दिवशी स्पष्टपणे दिसून येत आहे. (फोटो: निर्मल हरिंद्रन)
-
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा, पनवेल, गोरेगावपर्यंत दररोज १ हजार ७७४ लोकल फे ऱ्या होतात. यात के वळ ६० टक्केच फे ऱ्या रविवारी होतील. तर पश्चिम रेल्वेनेही चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यान दररोज १ हजार २७८ फे ऱ्या होतात. यातील ४७७ फेऱ्या रद्द असतील, अशी माहिती दिली. अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनचीही सेवा रद्द करण्यात आली आहे.
-
सीएसएमटी स्थानकावर सध्या असा शुकशुकाट आहे.
-
लोकल स्थानकांवर विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्यासच लोकल प्रवास करु दिला जाणार. लोकल ट्रेनचा अनावश्यक वापर होतो आहे ते टाळण्यासाठी हे निर्बंध लादले गेले आहेत.
-
२२ मार्च मध्यरात्रीपासून ते पुढील सुचना मिळेपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार आहेत आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी घातली आहे.
-
प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेशद्वारांवर पथकं नेमली जाणार १ GRP, १ राज्य पोलीस, महसूल विभागाचा एक प्रतिनिधी आणि एक वैद्यकीय प्रतिनिधी यांचा या पथकात समावेश आहे.
-
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील दृश्य. (फोटो : निर्मल हरिद्रन)
-
रविवारी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र जनता कर्फ्यूमुळे आज हा परिसर ओस पडला आहे.
-
रोज सकाळी चाकरमान्यांची गर्दी असणारा हा परिसरा असा निर्मनुष्य झाला आहे.
-
मुंबई महानगरपालिका आणि सीएसएमटीचा परिसरा असा ओस पडला आहे.
जनता कर्फ्यू: आयकार्ड पाहून रेल्वे स्थानकात प्रवेश; करोनामुळे मुंबईच्या लाईफलाईनचं वेगळं रुप
मुंबईत याआधी असं कधीही घडलं नाही
Web Title: Railway police and raiway staff cheacking passengers at csmt scsg