• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. assam forest officials seize kangaroo exotic wildlife from smugglers near mizoram border scsg

भारतात कांगारुची तस्करी ; ‘त्या’ ट्रकमधील प्राणी पाहून वन अधिकारीही चक्रवाले

ट्रकमधून कसला तरी दुर्गंध येत असल्याने तो थांबवण्यात आला

July 30, 2020 08:28 IST
Follow Us
  • आसाममधील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राणी तस्करांकडून चक्क एक कांगारु जप्त केला आहे. कांगारुबरोबरच सहा मस्कोज पक्षी, तीन दुर्मिळ कासवं आणि दोन माकडं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतली आहे. ही कारवाई आसाम-मिझोरमच्या सीमेजवळ करण्यात आली आहे. (Photo: ANI)
    1/

    आसाममधील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राणी तस्करांकडून चक्क एक कांगारु जप्त केला आहे. कांगारुबरोबरच सहा मस्कोज पक्षी, तीन दुर्मिळ कासवं आणि दोन माकडं वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतली आहे. ही कारवाई आसाम-मिझोरमच्या सीमेजवळ करण्यात आली आहे. (Photo: ANI)

  • 2/

    वन खात्याच्या काछर उपविभागाच्या अधिकाऱ्यांना संक्षय आल्याने त्यांनी सीलचार जिल्ह्यामध्ये एका ट्रकची तपासणी केली. मिझोरमवरुन येणाऱ्या या ट्रकची लैलापूर सब बिटच्या कर्मचाऱ्यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. (Photo : Twitter/kushaldebroy)

  • 3/

    या ट्रकमध्ये अधिकाऱ्यांना दुर्मिळ प्राणी आढळून आले. पोलिसांनी या ट्रकमधील नरसिंम्हा रेड्डी आणि नवनात धायगुडे या दोघांची चौकशी केली असता हे प्राणी गुवहाटीला नेले जात असल्याची माहिती समोर आली. (Photo : Twitter/cacharpolice)

  • 4/

    स्थानिक वन अधिकारी असणाऱ्या सनीदेव चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन खात्याकडून सामान्यपणे करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान हे प्राणी आढळून आले.

  • 5/

    ट्रकच्या मागच्या बाजूच्या भागामधून विचित्र वास येत असल्याने अधिकाऱ्यांना संक्षय आला. सुरुवातील खराब झालेली फळं असल्याचं कार ट्रकमधील व्यक्तींनी दिलं. मात्र तपासीण केली असता ट्रकमध्ये प्राणी आढळून आले.

  • 6/

    ऑस्ट्रेलियातून तस्करी करुन आणलेला कांगारु, सहा मॅकाओ पक्षी, दक्षिण अमेरिकेत सापडणारी दोन कॅप्युचीन प्रजातीची माकडे, अल्दाबार प्रजातीची तीन मोठी कासवं अधिकाऱ्यांना या ट्रकमध्ये सापडल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (Photo: ANI)

  • 7/

    अटक करण्यात आलेल्यांनी, त्यांना हा ट्रक मिझोरममध्ये ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले. हा ट्रक गुवहाटीमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आमच्यावर होती असंही अटक करण्यात आलेल्या दोघांनी सांगितले. (Photo : Twitter/assampolice)

  • 8/

    या सर्व प्राण्यांना गुवहाटी येथील प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलं आहे. या प्राण्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. हे परदेशातील दुर्मिळ प्राणी भारतात कसे आले यासंदर्भात पोलीस आता तपास करत आहेत.(Photo : Twitter/kushaldebroy)

  • 9/

    प्राणी तस्करीची प्रकरण उघडकीस आल्यावर लहान आकाराचे प्राणी, पक्षी सापडणे ही समान्य गोष्ट आहे. मात्र थेट कांगारुचीही तस्करी केली जात असल्याने अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.(Photo : Twitter/cacharpolice)

  • 10/

    सोशल नेटवर्किंगवरही कांगारु आणि अमेरिकेत सापडणारी माकडं या लोकांनी भारतात आणलीच कशी असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Photo : Twitter/cacharpolice)

Web Title: Assam forest officials seize kangaroo exotic wildlife from smugglers near mizoram border scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.