• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ayodhya ram temple bhoomi poojan guest list who will be present who will not scsg

राम मंदिर भूमिपूजन : निमंत्रण पत्रिकेवर पाच नावं, जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर

राम मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन ; १७५ जणांना निमंत्रण

August 4, 2020 11:39 IST
Follow Us
  • अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्टला होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिकाही तयार करण्यात आली असून त्यावर चार जणांचीच नावं आहेत. तर या सोहळ्याला करोनामुळे अयोध्येला न जाता येणाऱ्यांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनातील काही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सोहळ्याला कोण उपस्थित राहणार आहे याचसंदर्भातील माहिती आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत... (फोटो : पीटीआय)
    1/

    अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्टला होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिकाही तयार करण्यात आली असून त्यावर चार जणांचीच नावं आहेत. तर या सोहळ्याला करोनामुळे अयोध्येला न जाता येणाऱ्यांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनातील काही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सोहळ्याला कोण उपस्थित राहणार आहे याचसंदर्भातील माहिती आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत… (फोटो : पीटीआय)

  • 2/

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर सर्वात वरच्या स्थानी आहे.

  • 3/

    नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे.

  • 4/

    उत्तर प्रदेशच्या राज्यपाल

  • 5/

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे. आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावाही घेतला आहे.

  • 6/

    राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे.

  • 7/

    म्हणजेच निमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास या पाच मान्यवरांची नावे आहेत.

  • 8/

    निमंत्रितांच्या यादीतील काही नावे वगळण्यात आली असून, फक्त १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • 9/

    निमंत्रण पत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल.

  • 10/

    भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार नाहीत.

  • 11/

    अडवाणींबरोबरच मुरली मनोहर जोशी

  • 12/

    संग्रहीत

  • 13/

    भूमिपूजनाची पहिली निमंत्रण पत्रिका बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. अन्सारी यांनी निमंत्रण स्वीकारले असून ही भगवान रामाचीच इच्छा होती, असे उद्गार त्यांनी काढले. अयोध्येत िहदू-मुस्लीम वर्षांनुवष्रे सामंजस्याने राहतात. मंदिर बनेल, अयोध्येचे भविष्यही बदलेल, ते अधिक सुंदर होईल. स्थानिकांना रोजगार मिळेल, असा आशावाद अन्सारी यांनी व्यक्त केला.

  • 14/

    राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळ्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. “मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आलं आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे”, असं राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं आहे.

  • 15/

    राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी ५ ऑगस्टला करोनाचे भान ठेवून घरोघरी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी घरोघरी गुढय़ा-तोरणे उभारावीत, दारात कंदील, पणत्या लावाव्यात, सरकारी यंत्रणेची परवानगी घेऊन आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

  • 16/

    संग्रहित छायाचित्र

Web Title: Ayodhya ram temple bhoomi poojan guest list who will be present who will not scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.