• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. corona vaccine estimated cost fourfifty to five fifty rupees per person in india dmp

भारतात प्रतीमाणशी करोना लशीच्या डोसचा खर्च ४५० ते ५५० रुपये, कसा ते समजून घ्या…

October 23, 2020 17:05 IST
Follow Us
  • भारतात करोना व्हायरस विरोधात विकसित करण्यात आलेल्या लशीची चाचणी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर यशस्वीरित्या तिचे वितरण आणि खर्च एक मोठे आव्हान असणार आहे. (Photo: AP)
    1/

    भारतात करोना व्हायरस विरोधात विकसित करण्यात आलेल्या लशीची चाचणी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर यशस्वीरित्या तिचे वितरण आणि खर्च एक मोठे आव्हान असणार आहे. (Photo: AP)

  • 2/

    भारतातील १.३ अब्ज लोकसंख्येचे लसीकरण करणे, इतके सोपे नाहीय. त्याचा खर्चही प्रचंड असणार आहे. केंद्र सरकारने त्या दृष्टीने आता तयारी सुरु केली आहे. (Photo: Reuters)

  • 3/

    केंद्राने लशीकरणासाठी सात बिलियन म्हणजे सात अब्ज डॉलर्स, जवळपास ५१ हजार कोटी रुपये बाजूला काढले आहेत. लशीकरण कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

  • 4/

  • 5/

    ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाआधी लसीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे तसेच यापुढेही लशीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

  • 6/

    प्रत्येक माणसाला दोन इंजेक्शन द्यावी लागतील असे सरकारचे म्हणणे आहे. त्या दोन इंजेक्शनचा खर्च दोन डॉलर म्हणजे १५० रुपये आहे.

  • 7/

    त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरचा जो खर्च आहे, त्यात स्टोअरेज, वाहतूक खर्च येतो. त्यासाठी प्रतिमाणशी दोन ते तीन डॉलर बाजूला काढलेत. वर्किंग ग्रुपच्या शिफारशीनुसार ही तरतूद करण्यात आली आहे.

  • 8/

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशाला उद्देशून केलेल्या संबोधात करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न असेल, असे म्हटले होते.

  • 9/

    सरकारने लशी संदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती देशभरात शीत गृहांच्या साखळीची कशी व्यवस्था करता येईल, त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम करत आहे.

  • 10/

    लस उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्यक्रम म्हणजे कुठल्या गटाला, कोणाला ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे, त्यावरही आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Corona vaccine estimated cost fourfifty to five fifty rupees per person in india dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.