Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uk hospital told to prepare for oxford covid vaccine in november dmp

तयार राहा! पुढच्या आठवडयापासून ब्रिटनमध्ये सर्वसामान्यांना ऑक्सफर्डच्या लशीचे डोस मिळणार?

October 26, 2020 15:00 IST
Follow Us
  • करोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्डची लस गेमचेंजर ठरु शकते. या व्हायरसची लागण होऊन, आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या व्हायरसने जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले. लाखो लोकांचे जीवन जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. (Photo: AP)
    1/

    करोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्डची लस गेमचेंजर ठरु शकते. या व्हायरसची लागण होऊन, आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या व्हायरसने जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले. लाखो लोकांचे जीवन जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. (Photo: AP)

  • 2/

    AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी ही लस विकसित केल्यानंतर एप्रिल महिन्यात अस्त्राझेनेकाला या लशीचा परवाना दिला. मानवी चाचण्यांना गती देण्याची आणि उत्पादनाची जबाबदारी अस्त्राझेनेकावर आहे. (Photo: Reuters)

  • 3/

    अस्त्राझेनेकाने नंतर जगातील वेगवेगळया कंपन्या आणि सरकारांबरोबर लशीचा पुरवठा आणि उत्पादनाचे करार केले. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लशीचे 'कोविशिल्ड' या नावाने लशीचे उत्पादन करतेय.

  • 4/

    ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लशीची पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार रहा, असे लंडनमधील महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. 'द सन' न्यूज पेपरने हे वृत्त दिले आहे.

  • 5/

    करोना व्हायरसची साथ संपवण्यात ही लस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच पुढच्या आवठडयापासून करोना लशीसाठी तयार राहा, असे यूकेमधील महत्त्वाच्या रुग्णालयांना सांगण्यात आले आहे.

  • 6/

    जगातील अनेक देशात ऑक्सफर्डची लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

  • 7/

    वर्षभर या लशीपासून संरक्षण मिळू शकते असे जून महिन्यात कंपनीच्या सीईओंनी म्हटले होते.

  • 8/

    ‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.

  • 9/

    AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 लस टोचल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अँटीबॉडी आणि टी सेल्सची निर्मिती झाली असे फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

  • 10/

    ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. या आधी जुलैमध्ये ही लस १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ही लस जगाला करोनावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखवणार असल्याचं मानलं जात आहे. (छायाचित्र संग्रहित असून, प्रातिनिधीक स्वरूपात घेतेलेले आहेत.)

Web Title: Uk hospital told to prepare for oxford covid vaccine in november dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.