• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sii ceo adar poonawala tweet emergency use authorisation for the first made in india vaccine covishield sgy

“तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे २०२० संपण्याआधी..,” अदर पुनावाला यांचं करोना लसीबद्दल मोठं अपडेट

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडूनही मोठी अपडेट मिळाली आहे

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • संग्रहीत
    1/16

    संग्रहीत

  • 2/16

    सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे.

  • 3/16

    महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.

  • 4/16

  • 5/16

    तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे २०२० संपण्याआधीच सीरमने भारतात तयार करण्यात आलेली पहिली करोना लस कोविशिल्डच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी अर्ज केला असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

  • 6/16

    यामुळे अनेक जीव वाचतील. पाठिंबा दिल्याबद्दल मी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप आभार मानतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • 7/16

    दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

  • 8/16

    आयसीएमआरने गेल्या महिन्यात सीरमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारेच लस लवकरात लवकर उपलब्ध होण्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाऊ शकतो असं म्हटलं होतं.

  • 9/16

    आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, सीरमने आधीच चार कोटी डोसची निर्मिची केली आहे.

  • 10/16

    अधिकृत सूत्रांनुसार, सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, चार वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित करण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील दोन, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे. याआधारे कोविशिल्ड करोनाविरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

  • 11/16

    एकीकडे इतर लसींचा निकाल अद्याप हाती आला नसताना आणि महामारीचं मोठं ओझं असताना कोविशिल्ड करोनामुळे होणारे मृत्यू आणि लागण कमी करण्यात मदत करु शकतं असंही कंपनीने अर्जात सांगितल्याचं कळत आहे.

  • 12/16

    सीरमने अर्जात भारताला आत्मनिर्भर करण्यास तसंच पंतप्रधानांचं व्होकल फॉर लोकल आणि मेकिंग इन इंडियाचं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी कटिबद्द असल्याचं म्हटलं आहे.

  • 13/16

    सर्व गोष्टी लक्षात घेता तसंच देश आणि जगभरातील लाखो लोकांचा जीव वाचवण्यासााठी लवकरात लवकर लस उपलब्ध होणं गरजेचं असल्याचंही सीरमने म्हटलं आहे.

  • 14/16

    संग्रहीत

  • 15/16

    डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

  • 16/16

    बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Sii ceo adar poonawala tweet emergency use authorisation for the first made in india vaccine covishield sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.