• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. no drinking alcohol for two months after sputnik v covid 19 vaccine shot scsg

करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन करता येणार नाही; जारी करण्यात आली नियमावली

सरकारनेच नागरिकांना दिला आहे इशारा

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • करोनाचा जगभरातील जवळजवळ सर्वच देशांना मोठा फटका बसला आहे. करोनावर लस शोधण्यासंदर्भात जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळा आणि विद्यापिठांमध्ये संशोधन सुरु आहे. करोनाची लस लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. 
    1/16

    करोनाचा जगभरातील जवळजवळ सर्वच देशांना मोठा फटका बसला आहे. करोनावर लस शोधण्यासंदर्भात जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळा आणि विद्यापिठांमध्ये संशोधन सुरु आहे. करोनाची लस लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. 

  • 2/16

    मात्र करोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे. मात्र ही लस घेतल्यानंतरी आयुष्य लगेच पूर्वीप्रमाणे होईल अशी अपेक्षा असेल तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाहीय. 

  • 3/16

    कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्याआधीच रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी या लसीसंदर्भात नागरिकांना इशारा दिला आहे.

  • 4/16

    टास (टीएएसएस) या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना किमान दोन महिने मद्यप्राशन करता येणार नाही असं सांगितलं आहे. 

  • 5/16

    मात्र करोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. युनायटेड किंग्डम, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे. मात्र ही लस घेतल्यानंतरी आयुष्य लगेच पूर्वीप्रमाणे होईल अशी अपेक्षा असेल तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाहीय. 

  • 6/16

    रशियाच्या उप-पंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी करोना लसीसंदर्भातील सूचना आणि नियमांची घोषणा केली आहे.

  • 7/16

    करोनाची लस दिल्यानंतर शरीरामध्ये तिचा परिणाम दिसून येईपर्यंत नागरिकांना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे.

  • 8/16

    करोनाची लस दिल्यानंतर ती शरीरामध्ये सक्रीय होऊन परिणाम दाखवण्यास किमान ४२ दिवसांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात आलं आहे.

  • 9/16

    "लसीकरणानंतर रशियन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. मास्क घालणं, सॅनिटायझर वापरणं, किमान लोकांना भेटणं. मद्य सेवन टाळणं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं घेणं हे सारं करावं लागणार आहे," असं गोलिकोवा म्हणाल्या आहेत. 

  • 10/16

    जगात सर्वाधिक मद्यप्राशन करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणाऱ्या रशियाला दोन महिने मद्यप्राशन न करणं कितीपत जमणार आहे यासंदर्भात आताच शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

  • 11/16

    गामालय सेंटरने विकसित केलेली स्पुटनिक व्ही या लसीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रशियन सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली होती.

  • 12/16

    मान्यता मिळाल्यापासून आतापर्यंत एक लाखांहून अधिक हाय रिस्क म्हणजेच अधिक धोका असणाऱ्या करोनाच्या रुग्णांना स्पुटनिक व्ही ही लस देण्यात आली आहे, असं रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी मागील आठवड्यामध्ये संयुक्त राष्ट्रांसमोर दिलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये सांगितलं होतं.

  • 13/16

    रशियामध्ये डॉक्टर तसेच शिक्षकांना आधी लस देण्यासंदर्भात योजना आखली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

  • 14/16

    हे वर्ष संपेपर्यंत २० लाख रशियन नागरिकांना लस देण्याचं उद्देश असल्याचंही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  • 15/16

    कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या चाचणीच्या अंतरिम निष्कर्षांत म्हटले होते. 

  • 16/16

    लशीच्या चाचणीदरम्यान कुठलेही अनपेक्षित असे विपरीत परिणाम दिसून आले नाहीत. ज्यांच्यावर लशीची चाचणी करण्यात आली, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: एपी, रॉयटर्स आणि इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: No drinking alcohol for two months after sputnik v covid 19 vaccine shot scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.