-
सध्या संपूर्ण जगाला करोना लस कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. इतकंच नाही तर करोना लस आल्यानंतर ती आपल्याला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या स्पर्धेत श्रीमंत देशांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सध्या काय परिस्थिती आहे. (सर्व फोटो – संग्रहित)
-
भारताने आतापर्यंत १.६ अब्ज डोसची खरेदी केली आहे.
-
अमेरिकेतील Duke विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात श्रीमंत देश आणि विकसनशील देशांच्या लस खरेदीत खूप मोठं अंतर असल्याचं समोर आलं आहे.
-
आपल्या देशातील नागरिकांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी श्रीमंत देश जास्तीत जास्त लसीचे डोस विकत घेत आहेत.
-
मध्यम तसंच गरिब देशांकडे मात्र करोना लसींची खरेदी करण्याठी मुबलक पैसा उपलब्ध नाही.
-
डेटानुसार, एकदा लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर श्रीमंत देशांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जाणार आहे.
-
करोना लसीच्या खरेदीबद्दल बोलायचं गेल्यास भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
-
भारताने एकूण १.६ अब्ज लसींची खरेदी केली आहे.
-
यानंतर युरोपिअन युनिअनचा क्रमांक असून सहा वेगवेगळ्या कंपन्यांकडून १.३६ बिलियन लसींची खरेदी केली आहे.
-
अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून १.१ बिलियन लसीचे डोस खरेदी केले आहे.
-
यानंतर कॅनडा आणि युकेचा क्रमांक आहे.
-
पण जर लोकसंख्येचा विचार केला तर कॅनडाने पर्याप्त डोस खरेदी केले आहेत. कॅनडा पाचपेक्षा जास्त वेळा आपल्या नागरिकांचं लसीकरण करु शकतं.
-
अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसंख्येच्या तुलनेत कॅनडाने ६०१ टक्के, अमेरिकेने ४४३ टक्के, युकेने ४१८ टक्के, ऑस्ट्रेलियाने २६६ टक्के आणि युरोपिअन युनिअनने २४४ टक्के लसींची खरेदी केली आहे.
-
विकसनशील देशांबद्दल बोलायचं गेल्यास…भारत फक्त ५९ टक्के लोकसंख्येचं लसीकरण करु शकतो. मेक्सिको ८४ टक्के, ब्राझील ४६ टक्के, कझाकिस्तान १५ टक्के लोकसख्येचं लसीकरण करु शकतात.
-
फिलीपीन्स यामध्ये सर्वात तळाला असून फक्त एक टक्के लोकसंख्येचं लसीकरण करु शकतं.
-
नुकचं भारत सरकारने करोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण देशाविसायाचं लसीकरण करण्याचा विचार करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
-
सरकारने कधीही सर्वांचं लसीकरण केलं जाईल असं जाहीर केलेलं नाही असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं होतं. श्रृंखला तोडण्याचा उद्देश समोर ठेवूनच संबंधित लोकांना लस दिली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.
-
याशिवाय सरकारने लस कोणाला दिली जाईल याची यादी तयार केली आहे.
-
सर्वात प्रथम १ कोटी आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. यानंतर पोलीस, सैन्य दलातील जवान, ५० पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि त्यानंतर व्याधी असणाऱ्या ५० पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.
-
सध्या संपूर्ण जगभरात २६० कंपन्या करोना लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामधील आठ कंपन्या भारतात निर्मिती करणार आहेत.
श्रीमंत देशांमुळे गरिब देशांपुढे करोना लसीचं संकट; जाणवू शकतो तुटवडा; भारताची स्थिती काय?
सध्या संपूर्ण जगाला करोना लस कधी येणार याची उत्सुकता लागली आहे
Web Title: Coronavirus corona vaccines and what is indias situation sgy