-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या साताऱ्यातील वादळी सभेचं रेखाचित्र पुण्यात भिंतीवर रेखाटण्यात आलं आहे.
-
वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नारायण पेठ येथे हे चित्र रेखाटलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात उद्घाटन करण्यात आले.
-
"वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पालापाचोळ्याची फिकीर नको, इथे नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष आहे," असं या फोटोखाली लिहिण्यात आलं आहे.
-
यावेळी पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेना पक्ष प्रमुख संजय मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
-
१९ ऑक्टोबर २०१९ ला साताऱ्यात शरद पवारांची सभा सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला होता. मात्र शरद पवारांनी न थांबवता पावसात भाषण केलं होतं.
-
शरद पवार साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते.
-
शरद पवारांच्या या सभेमुळे उदयनराजे यांचा पराभव झाला आणि श्रीनिवास पाटील निवडून आले होते.
-
वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवारांना दाखवलेल्या उत्साहाचं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने कौतुक केलं होतं.
-
त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
‘नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष’, पुण्यातली भिंत देतीये शरद पवारांच्या वादळी सभेची साक्ष
दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नारायण पेठ येथे हे चित्र रेखाटलं आहे
Web Title: Sharad pawar satara rally painting on wall in pune svk 88 sgy