• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. corona bjp mla ram satpue marriage ceremony photos viral police to investigate sgy

भाजपा आमदाराच्या शाही विवाहसोहळ्याची पोलीस चौकशी; फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह शेकडो कार्यकर्त्यांची हजेरी

भाजपाच्या दिग्गज नेत्यांसमोर करोना नियम पायदळी

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या पुण्यात पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. (Photos: Twitter)
    1/16

    भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या पुण्यात पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. (Photos: Twitter)

  • 2/16

    विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर राम सातपुते यांचा विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे.

  • 3/16

    राम यांचे आई-वडील ऊसतोडी करत होते. भाजपानेही एका उसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिल्याची चर्चा होती.

  • 4/16

    राम सातपुते यांच्या राहत्या घराचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सातपुते यांच्या उंचीहून कमी उंचीचे गावातील एक पत्रे टाकलेले, मातीने सारवलेल्या भिंती असणारे घर दिसत होते.

  • 5/16

    हे घरही सातपुते यांच्या मालकिचे नसून त्यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्या मालकीचे आहे. सातपुते यांनी उमेदवारी अर्जबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:च्या नावावर घर नसल्याचे सांगितले होते. सातपुते यांची एकूण जंगम मालमत्ता ५ लाख २५ हजार ७६० रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. तसेच आपल्यावर ७५ हजाराचे कर्ज असून आपल्या नावावर शेतजमीन अथवा कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

  • 6/16

    एरंडवणे भागातील डी. पी. रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात आमदार सातपुते यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

  • 7/16

    या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार गिरीश बापट यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • 8/16

    दरम्यान राम सातपुते यांचा सातपुते यांचा विवाहसोहळा वादात सापडला

  • 9/16

    करोनाच्या संसर्गात विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा असताना त्याचे उल्लंघन केल्याने पोलीस चौकशी करत आहेत.

  • 10/16

    मर्यादित उपस्थिती आणि सुरक्षित अंतर यांसह विविध नियमांचे पालन न करता हा सोहळा झाल्यामुळे त्याची चौकशी होणार आहे.

  • 11/16

    बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्याबाबत दिलेली नियमावली धुडकावण्यात आली.

  • 12/16

    या सोहळ्याची आता पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • 13/16

    याबाबत सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, सातपुते यांच्या विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती पोलिसांकडे आली आहे. अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 14/16

    जगदाळे यांच्याकडून याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

  • 15/16

    सातपुते यांच्या विवाह सोहळ्यातील उपस्थितांनी सुरक्षित अंतरदेखील पाळले नव्हते तसेच काहीजणांनी मुखपट्टी परिधान केली नव्हती.

  • 16/16

    विवाह सोहळ्यात उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलेली असताना शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. त्यानंतर सातपुते यांचा विवाह सोहळा वादात सापडला.

Web Title: Corona bjp mla ram satpue marriage ceremony photos viral police to investigate sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.