• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. german floods photos western europe floods kills many search for survivors continues scsg

Flood of Death Photos : १५ मिनिटांमध्ये गावच्या गावं गेली वाहून; १५३ जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेकांपर्यंत अजून मदत पोहचलेली नाही हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

July 17, 2021 16:19 IST
Follow Us
  • Western Europe Floods German floods
    1/50

    युरोपमधील काही भागांमध्ये आलेलेल्या पुरामध्ये संपूर्ण गावचं गावं वाहून गेली आहे.

  • 2/50

    अचानक आलेल्या या पुरामध्ये आतापर्यंत (१७ जुलै २०२१ पर्यंत) १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 3/50

    मरण पावलेल्या १५३ जणांपैकी १३३ जण हे पश्चिम जर्मनीतील आहे.

  • 4/50

    पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.

  • 5/50

    बेपत्ता झालेल्या शेकडो जणांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

  • 6/50

    जर्मनीमधील बिल्ड या वृत्तपत्राने अचानक आलेल्या या पुराला 'Flood of Death' म्हणजेच, 'मृत्यूचा पूर' असं म्हटलं आहे.

  • 7/50

    अचानक आलेल्या या पुरामुळे स्थानिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही.

  • 8/50

    हे सारं इतक्या पटकन घडलं की अनेक गाड्या अशाप्रकारे हायवेवरच होत्या त्या ठिकाणी बुडाल्या.

  • 9/50

    या फोटोमध्ये बुडलेल्या कंटेनरवरुन पाण्याच्या पातळीचा अंदाज सहज लावता येतोय.

  • 10/50

    मोठ्या आकाराच्या गाड्याही वाहून गेल्यात.

  • 11/50

    बेल्जियमच्या काही भागांनाही या पुराचा फटका बसलाय.

  • 12/50

    अनेक भागांमध्ये रस्ते आणि घरं पाण्याखाली गेली आहेत.

  • 13/50

    अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामघ्ये गाड्याही वाहून गेल्या आहेत.

  • 14/50

    काही जिल्ह्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय.

  • 15/50

    "अवघ्या १५ मिनिटांमध्ये सारं काही पाण्याखाली गेलं," असं येथील एका २१ वर्षीय अ‍ॅगरॉन बेर्शिचा याने एफपीशी बोलताना सांगितलं.

  • 16/50

    डेकोरेटर असणाऱ्या अ‍ॅगरॉनने, "आमचं ऑफिस, घर, शेजाऱ्यांचं घर सगळीकडे पाणीच पाणी आहे," असंही सांगितलं.

  • 17/50

    पुराच्या पाण्यामध्ये घरं अगदी बेटांप्रमाणे दिसत होती.

  • 18/50

    झाडं पडल्याने खूप साऱ्या गाड्यांचं नुकसान झालं आहे.

  • 19/50

    आम्ही मागील २० वर्षांपासून येथे राहत आहोत. मात्र यापूर्वी निर्सगाचा असा प्रकोप कधीही पाहिला नाही. हे एखाद्या युद्धभूमीमध्ये असल्यासारखं आहे, असं येथील स्थानिकांनी म्हटलं आहे.

  • 20/50

    ऱ्हाइनलॅण्ड-पॅलटिनेटचे इंटीरीयर मिनिस्टर असणाऱ्या रॉजर लिवेत्झ यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केलीय.

  • 21/50

    मदतकार्य पोहचवणाऱ्या टीम अद्याप प्रभावित प्रदेशामध्ये पूर्णपणे पोहचलेल्या नाही. त्यामुळे मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं लिवेत्झ म्हणालेत.

  • 22/50

    मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी गल्ल्यांमध्ये शिरले आणि त्यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आणि घरे कोसळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  • 23/50

    इर्फस्टॅड्टमध्ये पुरामुळे भुस्सखलन झाल्याने अनेक लोक या ढिगाऱ्या खाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 24/50

    बेल्जियमलाही या पुराचा फटका बसला असून शुक्रवारच्या आकडेवारीनुसार बेल्जियममधील २० जणांचा आतापर्यंत या पुरामध्ये मृत्यू झालाय.

  • 25/50

    २१ हजार जणांची वस्ती असणाऱ्या भागांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याचं बेल्जियमने म्हटलं आहे.

  • 26/50

    आमच्या देशामधील हा सर्वात मोठा नैसर्गिक प्रकोप असल्याचं बेल्जियमचं पंतप्रधान अ‍ॅलेक्झॅण्डर डी कूर यांनी गुरुवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना सांगितलं.

  • 27/50

    जर्मनीतील ऱ्हाइनलॅण्ड-पॅलटिनेटमध्ये गुरुवारपर्यंत मृतांचा आकडा ५० होता. तर शेजारी असलेल्या उत्तर ऱ्हाइन-वेस्टफालिया राज्यात ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

  • 28/50

    इर्फस्टॅड्ट शहरात घरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मदतकार्य पथक तातडीने रवाना झाले आहेत.

  • 29/50

    अनेक जणांचा घरे कोसळून मृत्यू झाल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • 30/50

    आम्ही गुरुवारी रात्री ५० जणांची त्यांच्या घरातून सुखरूप सुटका केली, आणखी १५ जणांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासकीय अधिकारी फ्रॅन्क रॉक यांनी सांगितलं होतं.

  • 31/50

    अनेकजण मिळेल ते सामान गोळा करुन घेताना दिसत आहेत.

  • 32/50

    जर्मनीतील जवळपास १३०० जण अद्यापही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • 33/50

    लक्झ्मबर्ग आणि नेदरलँड्सलाही या पुराचा फटका बसला आहे.

  • 34/50

    लक्झ्मबर्ग आणि नेदरलँड्सलामध्येही हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

  • 35/50

    काही ठिकाणी पुराचं पाणी अनेक दिवस ओसरलेलं नाहीय.

  • 36/50

    अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अशाप्रकारे साचलेल्या पाण्यामधून पुरवठा केला जातोय.

  • 37/50

    हजारो घरांची पडझड झालीय तर काही अशाप्रकारे थेट वाहून गेलीयत.

  • 38/50

    गाड्या तर खेळण्यातील गाड्यांप्रमाणे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात.

  • 39/50

    गाड्यांना रस्त्यांवरुन बाजूला काढण्यासाठी अनेक ठिकाणी अशाप्रकारे क्रेन्सचा वापर केला जातोय.

  • 40/50

    रस्त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.

  • 41/50

    काही ठिकाणी तर भूकंपानंतर पडतात तशा मोठमोठ्या भेगा रस्त्यांवर पडल्यात.

  • 42/50

    अवजड सामानही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं आहे.

  • 43/50

    तुमचा विश्वास बसणार नाही पण हा एक कालवा आहे. पुराचं पाणी वाहून गेल्यानंतर पाण्यासोबत वाहून आलेल्या वस्तूंचा अशाप्रकारे खच पडलाय.

  • 44/50

    छोट्या उद्योजकांचंही फार नुकसान झालं आहे.

  • 45/50

    पाण्याची डबकी तयार झाल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय.

  • 46/50

    सगळीकडे हे असच चित्र दिसत आहे. घरातून बाहेर पडल्या पडल्या पुरातून वाहून आलेला मलबाच दूरदूरपर्यंत दिसत आहे.

  • 47/50

    रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि वाहून आलेल्या गाड्यांना बाजूला केलं जात आहे.

  • 48/50

    रस्ते वाहतुकी सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला काढून ठेवलेला पुराच्या पाण्यात वाहून आलेला लाकडांचा हा ढिगारा पाहूनच पूर किती भयंकर होता याचा अंदाज बांधता येतो.

  • 49/50

    लवकरात लवकर मदतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांपर्यंत पोहचण्याचं आव्हान सध्या मदतकार्यामध्ये असलेल्या टीम्ससमोर आहे.

  • 50/50

    हे मदतकार्य आखीन बऱ्याच दिवस सुरु राहणार असल्याचं सांगतिलं जातं आहे. येथील राहणीमान पूर्वव्रत व्हायला बराच कालावधी जाणार आहे. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)

TOPICS
पूरFlood

Web Title: German floods photos western europe floods kills many search for survivors continues scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.