Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. governor bhagat singh koshyari on sinhagad fort svk 88 scsg

वयाच्या ८० व्या वर्षी राज्यपाल चालत पोहचले सिंहगडावर; स्थानिकांनी ओवाळल्यावर म्हणाले, “आमच्या उत्तराखंडमध्येही…”

याच दिवशी एका वर्षापूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट २०२० रोजी राज्यपालांनी शिवनेरी गडाचा पायी दौरा केला होता

August 16, 2021 12:25 IST
Follow Us
  • Governor bhagat singh koshyari on sinhagad fort
    1/15

    गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगडावर पोहचले.

  • 2/15

    सिंहगडावर राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. वेलकम असेही रांगोळीमध्येच लिहिले होते.

  • 3/15

    एका ठिकाणी काही महिलांनी सिंहगडाच्या दिशेने जाताना राज्यपालांना थांबवलं आणि त्यांना ओवळलं देखील.

  • 4/15

    टीळा लावून स्थानिक महिलांनी राज्यपालांचं स्वागत केलं.

  • 5/15

    राज्यपालांनाही नम्रपणे हात जोडून नमस्कार करत, हसत हसतच स्थानिकांकडून करण्यात आलेलं हे स्वागत स्वीकारलं.

  • 6/15

    आमच्या उत्तराखंडमध्येही असेच गड आहेत असं राज्यपालांनी स्थानिकांना सांगितलं.

  • 7/15

    तुम्ही एकदा या तिकडे, असं सांगत राज्यपालांनाही स्थानिकांना उत्तराखंडमधील गड पाहण्यासाठी येण्याचं अनौपचारिक आमंत्रणही दिलं.

  • 8/15

    स्थानिकांचं स्वागत स्वीकारुन राज्यपाल किल्ल्याकडे मार्गस्थ झाले.

  • 9/15

    रविवारी शिवसृष्टीच्या कार्यक्रमानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्रकारांनी या दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

  • 10/15

    आपण उद्या सिंहगडावर जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर कोश्यारी यांनी क्षणाचाही विलंब न करता. "आप भी आ जाना," असे उत्तर दिले. त्यानंतर या उत्तरावरुन एकच हशा पिकला. (इथपर्यंतचे सर्व फोट सागर कासार यांच्याकडून साभार)

  • 11/15

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट २०२० रोजी पायी चालत शिवनेरी किल्ली सर केला होता. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला होता. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले. (येथून पुढे सर्व फोटो Twitter/maha_governor वरुन साभार)

  • 12/15

    राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले होते.

  • 13/15

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते गडावरील शिवाई देवीची आरती करण्यात आली होती.

  • 14/15

    शिवनेरी गडावर भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं. याचसोबत गडावरील इतर ऐतिहासिक गोष्टीही राज्यपालांनी मन लावून पाहिल्या.

  • 15/15

    शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेसमोर कोश्यारी लीन होऊन नतमस्तक झाल्याचं पहायला मिळालं होतं. शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा आणि प्रतिमेचं पुजन करून राज्यपालांच्या हस्ते खास वृक्षारोपण करण्यात आलं होतं.

TOPICS
महाराष्ट्रMaharashtra

Web Title: Governor bhagat singh koshyari on sinhagad fort svk 88 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.