Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important 10 big allegations on ncb sameer wankhede k p gosawi by prabhakar sail pbs

छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या १० आरोपांचा आढावा.

October 24, 2021 16:20 IST
Follow Us
  • छाप्याआधीच किरण गोसावी आणि समीर वानखेडेंसह एनसीबी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर ते क्रुझवर गेले : प्रभाकर साईल
    1/10

    छाप्याआधीच किरण गोसावी आणि समीर वानखेडेंसह एनसीबी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर ते क्रुझवर गेले : प्रभाकर साईल

  • 2/10

    २ ऑक्टोबर रोजी दुपारी क्रुझ गेटवर गोसावी यांनी मला काही फोटो पाठवून त्या लोकांना ओळखण्यास सांगितलं. त्या १०-१२ लोकांपैकी मी केवळ एका व्यक्तीला ओळखू शकलो : प्रभाकर साईल

  • 3/10

    काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. पाठवलेल्या फोटोंपैकी एक मुनमुन धमेचा होती : प्रभाकर साईल

  • 4/10

    ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला सोडून देण्यासाठी के. पी. गोसावीने सॅम नावाच्या मध्यस्थामार्फत अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली : प्रभाकर साईल

  • 5/10

    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर मी पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केली : प्रभाकर साईल

  • 6/10

    आर्यनला रात्री १२ वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आणलं. त्यानंतर पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने मला एनसीबी कार्यालयात बोलावलं. साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मला कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्या. मी नकार दिला असता समीर वानखेडेंनी काहीच होणार नाही, तू सही कर असं म्हटलं. तेव्हा मी जवळपास १० कोऱ्या कागदावर सह्या केल्या : प्रभाकर साईल

  • 7/10

    एनसीबी कार्यालयात किरण गोसावीने आर्यन खानला फोनवरून कुणाशी तरी बोलणं करून दिलं. यानंतर काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला : प्रभाकर साईल

  • 8/10

    सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली : प्रभाकर साईल

  • 9/10

    किरणने मला ५० लाख रुपये आणायला जायला सांगितलं. इंडियाना हॉटेलजवळ गाडीतल्या दोघांनी पिशव्या दिल्या, त्यात पैसे होते. ते पैसे घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला परत गेलो : प्रभाकर साईल

  • 10/10

    दुसऱ्या दिवशी गोसावीने फोन करून बोलावलं आणि पैशाची पिशवी सॅमला दिली : प्रभाकर साईल

TOPICS
आर्यन खानAryan KhanएनसीबीNCBसमीर वानखेडेSameer Wankhede

Web Title: Important 10 big allegations on ncb sameer wankhede k p gosawi by prabhakar sail pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.