• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos drugs case nawab malik ncb sameer wankhede lifestyle abn

७० हजारांचा शर्ट, पॅन्ट लाख रुपयांची, दोन लाखांचे बुट; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांची टीका

दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल असेही नवाब मलिक म्हणाले

November 2, 2021 14:20 IST
Follow Us
  • मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण रोज नवे वळण घेताना दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जात आहेत
    1/10

    मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण रोज नवे वळण घेताना दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जात आहेत

  • 2/10

    मंगळवारी नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना समीन वानखेडेंवर टीकास्त्र सोडले आहे.

  • 3/10

    “ड्रग्ज प्रकरणात वसुली मालदीव येथे झाली आहे. आम्ही दुबई आणि मालदीव दोघांचे फोटो टाकले आहे. समीर वानखेडे मालदिवला आणि त्यांची बहिण दुबईमध्ये होत्या, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

  • 4/10

    इतक्या लोकांना मालदीवला जाण्यासाठी २० ते ३० लाखांचा खर्च येतो. एनसीबीच्या दक्षता विभागाने याचा खर्च कोणत्या खात्यातून करण्यात आला याची चौकशी करायला हवी, असे नवाब मलिक म्हणाले.

  • 5/10

    यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप केला आहे. (फोटो ANI)

  • 6/10

    समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत ५० हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरु होते, असे मलिक म्हणाले.

  • 7/10

    वानखेडेंच्या हातातील घड्याळे दररोज बदलतात, ज्यांची किंमत २० हजारांपासून सुरु होते, ती एक कोटींपर्यंत किमतीची आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे. (PTI)

  • 8/10

    एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल, असेही मलिक म्हणाले.

  • 9/10

    या सर्व काळात समीर वानखेडेंनी जशाप्रकारचे कपडे घातले आहेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडियावरुन साभार)

  • 10/10

    समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी. समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (फोटो- PTI)

TOPICS
एनसीबीNCBड्रग्ज केसDrugs Caseनवाब मलिकNawab Malikसमीर वानखेडेSameer Wankhede

Web Title: Photos drugs case nawab malik ncb sameer wankhede lifestyle abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.