-

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना सोमवारी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान केले.
-
सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
-
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आदी उपस्थित होते.
-
सुषमा स्वराज यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सर्व सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केले आणि विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली.
-
सुषमा स्वराज १९९८ मध्ये अल्प कालावधीसाठी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
-
तसेच त्या मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये परराष्ट्र मंत्री होत्या.
-
सुषमा स्वराज यांचं ६ ऑगस्ट २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने एम्समध्ये निधन झालं.
-
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
-
पद्म पुरस्कार हा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे.
-
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Web Title: Former external affairs minister sushma swaraj awarded by padma vibhushan posthumously hrc