• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know who is saurabh kirpal whom supreme court recommend as judge pbs

Photos : सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच न्यायाधीश म्हणून समलैंगिक वकिलाची शिफारस, कोण आहेत सौरभ कृपाल?

देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका समलैंगिक व्यक्तीची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी शिफारस केलीय. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात कोण आहेत सौरभ कृपाल?

November 16, 2021 16:16 IST
Follow Us
  • देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका समलैंगिक व्यक्तीची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी शिफारस केलीय. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
    1/12

    देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका समलैंगिक व्यक्तीची उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी शिफारस केलीय. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.

  • 2/12

    सौरभ कृपाल हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या याचिकेची सुनावणी करताना देशात समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्या याचिकेत सौरभ कृपाल हे वकील होते.

  • 3/12

    सौरभ कृपाल हे भारताचे माजी सरन्यायाधीश भुपिंदर नाथ कृपाल यांचे पुत्र आहेत. भुपिंदर नाथ कृपाल २००२ मध्ये सरन्यायाधीश होते.

  • 4/12

    सौरभ कृपाल यांनी जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर मागील २ दशकांपासून ते वकिली करत आहेत.

  • 5/12

    सर्वात आधी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गिता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ऑक्टोबर २०१७ मध्ये सौरभ कृपाल यांच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी नावाची शिफारस केली. मात्र, पुढे २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस केली नव्हती.

  • 6/12

    यानंतर पुन्हा जानेवारी २०१९, एप्रिल २०१९ आणि ऑगस्ट २०२० मध्ये सौरभ कृपाल यांच्या नावाची उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केली.

  • 7/12

    यानंतरही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून त्यांच्या नावाची शिफारस न झाल्यानं टीकाही झाली. तसेच कृपाल समलैंगिंक असल्यानंच त्यांची शिफारस होत नसल्याचा आरोप झाला.

  • 8/12

    केंद्र सरकारने सौरभ कृपाल यांच्या नावाचा विरोध करताना त्यांचे जोडीदार युरोपियन असून ते स्वीस दुतावासात काम करत असल्याचं कारण सांगितलं.

  • 9/12

    मार्च २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या सर्व ३१ न्यायाधीशांनी एकमताने सौरभ कृपाल यांची ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली.

  • 10/12

    सौरभ कृपाल ‘सेक्स आणि सुप्रीम कोर्ट’ (Sex and the Supreme Court) या पुस्तकाचे लेखक आणि संपादकही आहेत.

  • 11/12

    या पुस्तकात अनेक प्रसिद्ध न्यायाधीशांनी आणि वकिलांनी लेख लिहिले आहेत.

  • 12/12

    कृपाल यांनी संयुक्त राष्ट्रासोबतही काम केलं आहे.

TOPICS
लिंगGenderसर्वोच्च न्यायालयSupreme Court

Web Title: Know who is saurabh kirpal whom supreme court recommend as judge pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.