• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis is surrounded by dirty politics eknath khadse abn

फडणवीसांना घाणेरडं राजकारण भोवतंय; एकनाथ खडसेंनी साधला निशाणा

देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते, असा टोला खडसेंनी याआधी लगावला होता

November 25, 2021 17:04 IST
Follow Us
  • भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अलीकडच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षात एकाकी आणि कमकुवत केले आहे.
    1/18

    भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अलीकडच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षात एकाकी आणि कमकुवत केले आहे.

  • 2/18

    इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस ते भाजप सरचिटणीस या पदावर झालेली बढती आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी हे त्याचेच संकेत आहेत.

  • 3/18

    यामुळे २०२४च्या निवडणुकीत पक्षाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांचे भविष्य अनिश्चित आहे.

  • 4/18

    भाजपानेच एकेकाळी त्यांना राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढच्या पिढीतील हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहिले होते.

  • 5/18

    फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री तावडे यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारले होते. अखेर २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी तावडे यांना तिकीट नाकारण्यात आले.

  • 6/18

    तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या नागपुरातील माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी नेते बावनकुळे यांनाही तिकीट देण्यात आले नाही. यामुळे विदर्भात भाजपाला किमान सहा जागांचा फटका बसला.

  • 7/18

    याबाबत राजकारणात संयमाची किंमत असते. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा एक मोठा संदेश आहे, असे विनोद तावडे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना म्हटले आहे.

  • 8/18

    तर पक्षाने माझी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. आता त्यांनी मला परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भूतकाळात जे घडले त्याबद्दल मी दुःखी का व्हावे?, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

  • 9/18

    पण फडणवीसांनी बाजूला सारल्याने भाजपा सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे इतके मुत्सद्दी नव्हते.

  • 10/18

    भिंतीवरील लिखाण सर्वांसाठी स्पष्ट होते. फडणवीस यांनी घाणेरडे राजकारण केले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

  • 11/18

    फडणवीसांनी आपले सर्व राजकीय प्रतिस्पर्धी संपवले. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास त्यांना लाभल्यामुळे हे घडले असे खडसे म्हणाले.

  • 12/18

    पण लवकरच गोष्टी उलगडू लागल्या. त्यामुळे छळाला कंटाळून मी भाजपा सोडला.

  • 13/18

    देवेंद्र फडणवीसांमुळेच मी भाजपा सोडला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

  • 14/18

    विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती

  • 15/18

    देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते.

  • 16/18

    जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची.

  • 17/18

    फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत, अशी टीका एकनाथ खडसेंनी या आधी केली होती.

  • 18/18

    केंद्रीय नेतृत्वांच्या निर्णयांवरून एक गोष्ट स्पष्ट होते पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या नेत्याचे पंख छाटण्यास सुरुवात त्यांनी केली आहे.

TOPICS
एकनाथ खडसेEknath Khadseदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Devendra fadnavis is surrounded by dirty politics eknath khadse abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.